पुणे: देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला (Tomato price hike) भिडले आहेत. काही भागात टोमॅटोचे दर 300 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्याचा परिणाम जनतेच्या खिशावर होत आहे. काही लोकांनी स्वयंपाकघरात टोमॅटो वापरणे बंद केले आहे, तर अनेकजण आता पर्याय शोधत आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किमतीत एक नवीन गोष्ट समोर आली आहे. दुबईत राहणाऱ्या एका मुलीने तिच्या आईसाठी सुटकेसमध्ये 10 किलो टोमॅटो आणले.
‘रेव्स’ नावाच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेयर करण्यात आली आहे. यासोबत एक फोटोही शेयर करण्यात आलाय. यामध्ये युजरने लिहिले की, “माझी बहीण तिच्या मुलांसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी दुबईहून भारतात येत होती. तिने आईला विचारले की तिला दुबईहून काही आहे का? यावर आई म्हणाली 10 किलो टोमॅटो घेऊन ये. आणि तिने 10 किलो टोमॅटोही एका सुटकेसमध्ये भरलेही.”
सध्या ट्विटरवर हे ट्विट 54,000 हून अधिक वेळा लोकांनी पाहिले आहे आणि 700 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. “आमचे कुटुंब टोमॅटो भरपूर वापरते, त्यामुळे आता मी दुबईहून आणलेल्या या टोमॅटोचे लोणचे, चटणी असे काहीतरी बनवणार आहे. असं कॅप्शनही त्याला देण्यात आलंय. या पोस्टवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या असून ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एका ट्विटर युजरने गंमतीत लिहिले की, महागड्या वस्तू आणताना तुमच्या बहिणीला विमानतळावर पकडू नये.
My sister is coming to India from Dubai for her children’s summer holidays and she asked my mum if she wanted anything from Dubai and my mother said bring 10 kilos of tomatoes. ?? And so now she has packed 10kg tomatoes in a suitcase and sent it.
I mean…….— Revs 🙂 (@Full_Meals) July 18, 2023
इथे टोमॅटोच्या वाढत्या किमतीत, पुण्यातील शेतकरी अवघ्या महिनाभरात कोट्यवधी झाला आहे. जुन्नर तालुक्यातील पाचघर गावातील ईश्वर गायकर (३६) या शेतकऱ्याची. मे महिन्यात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याने नुकसान सहन करावे लागले होते. मात्र, तरीही त्याने अपयशाने खचून न जाता त्यांनी आपल्या 12 एकर शेतीत टोमॅटोची लागवड सुरू ठेवली. याच फळ त्यांना मिळालं असून टोमॅटो विक्रीतून 3 कोटी रुपये मिळवत तो कोट्याधीश झाला आहे.