नाशिक : नाशिक महापालिकेत इंटरनेट सेवा गुरूवारी (दि. 15) संपूर्ण दिवसभर खंडीत झाली होती. त्यामुळे महापालिकेचे 19 कर भरणा केंद्र दिवसभर बंद होते. यामुळे महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) तिजोरीत कर जमा होऊ शकला नाही. दिवसभर भरणा केंद्रातील कर्मचारी इंटरनेट (Internet Service) सेवा सुरू होण्याची प्रतिक्षा करत होते.
महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील स्वागत कक्षातील नागरी सेवा केंद्रासह मनपाने सहा विभागीय कार्यालये तसेच उप-कार्यालयांमध्ये एकूण 19 कर भरणा केंद्रांमध्ये कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गुरूवारी (दि. 15) या केंद्रांसाठी असलेली इंटरनेट सेवाच बंद असल्याने भरणा केंद्रही बंदच होते. त्यामुळे नागरिकांना आल्या पावली माघारी फिरावे लागत होते.
मनपाने नियमित कर भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी सवलत योजना आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यासाठी आठ टक्के, मे महिन्यात क भरणा केल्यास त्यावर सहा टक्के तर जून महिन्याकरता तीन टक्के सवलत दिल जाते. त्यानुसार या सवलत योजनेमुळे मनपाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे.
एप्रिल महिन्यात 8 टक्के, मे महिन्यात भरणा केल्यास त्यावर सहा टक्के तर जून महिन्यासाठी तीन टक्के सवलत दिली जाते. त्यानुसार, एप्रिल महिन्यात 48 कोटी 10 लाख 26 हजार, मे महिन्यात 14 कोटी चार लाख 51 हजार तर जून महिन्यात 4 कोटी 42 लाख 81 हजार रूपयांचा कर जमा झाला आहे.
मार्चअखेर कर वसुली होण्यासाठी मनपा प्रशासकांनी सुट्ट्यांच्या दिवशी नागरिकांच्य सोयीकरता कर भरणा केंद्र सुरू ठेवले होते. जून महिना उजाडल्याने प्रशासनाने ही कर वसुली सेवा बंद केली आहे. यामुळे सुट्टीच्या दिवशी देखील सेवा बजावण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.