जळगाव : जळगावमध्ये देखील आता ईडी सक्रीय झाली आहे. सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगामध्ये ईडीने धाडी टाकल्या आहेत. प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर (Rajmal Lakhichand Jewelers) ईडीच्या (ED) पथकानं कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. त्यामुळं माजी आमदार मनीष जैन ( Manish Jain) आणि माजी खासदार ईश्वर जैन (Ishwar Jain ) यांना हा धक्का मानला जात आहे. (ED raid in Suvarna Nagar, ED raid on Rajmal Lakhichand jewellers, ED said)
कोणत्या कारणासाठी धाड?
दरम्यान, राजमल लखीचंद ज्वेलर्स ह्या माजी आमदार मनीष जैन ( Manish Jain) आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या आहेत. स्टेट बँकेकडून (SBI) घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्बात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या कारवाईमुळं जळगावच्या (Jalgaon) सुवर्ण नगरीत मोठी खळबळ उडाली आहे.
सीबीआय चौकशीनंतर ईडीची छापेमारी
मागील वर्षीसुद्धा सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी केली होती. यानंतर आता ईडीच्या पथकाने जळगावमधील राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी सुरु केली आहे. त्यामुळं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबादसह विविध जिल्ह्यातून ईडी पथकाच्या 10 गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. यात कारवाईमध्ये ईडीचे एकूण 60 कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. स्टेट बँकेकडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्ज विषयक ही कारवाई असल्याचं सांगितलं जातं आहे.