पुणे : राज्यात उन्हाळा जास्तच तापू लागला आहे. या तापमानाचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होऊ लागला आहे. दूध संकलनात 30 ते 35 टक्क्यांनी घटून पशुधनाला विविध आजारांची लागण होत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासुन दुग्धव्यवसाय संकटात सापडत आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात शेतीला जोड व्यवसाय म्हणुन शेतकरी दुग्धव्यवसाय करत आहेत. दुग्धव्यवसाय संकटात सापडल्यामुळे, कधी दुधाचे दर पडतात तर कधी दुग्ध उत्पादनात घट होते. सध्या, वातावरणाचे तापमान 40 अंशांवर पोहोचले आहे.
दरम्यान या वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यासह दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. उन्हाळी हंगामामुळे हिरव्या चाऱ्याची टंचाई आहे. त्यामुळे दुग्ध जनावरे डोंगरमाळरानावर कडाक्याच्या उन्हात भटकंती करतात उन्हाच्या तापमानमुळे डोंगवरचा चारा तापल्याने जनावरे चारा खात नाहीत, तर उन्हाच्या कडाक्यात जनावरे सावलीचा आश्रय घेतात. मात्र, सावलीतही उष्ण आणि उकाडा असल्याने जनावरांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने दुध संकलानावर परिणाम होत असल्याचे पशुवैद्यकिय डॉक्टर सांगतात.
वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या आतड्यांमध्ये आकस्मिक बदल होतो. जनावर खाताना रवंथ करत नाही त्यामुळे अपचना सारखे आजार होतात. त्यामुळे याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर घट होऊन दूध संकलन 25 टक्क्यांनी घटले असल्याचे शेतकरी सांगतात.
[read_also content=”शाळेला घेऊन जाणाऱ्या वाहनाचा रेडिएटर फुटला, दोन विद्यार्थी भाजले https://www.navarashtra.com/maharashtra/the-radiator-of-the-school-bus-exploded-burning-two-students-nrdm-259702.html”]
वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे पाळीव जनावरांसह जंगली प्राणी पक्षी यांचे शरीराचे तापमान वाढते त्यांच्या शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी शरीर क्रियेचा वेग वाढवून शरीराबाहेर टाकले जाते त्यामुळे जनावरांच्या शरीर क्रियेवर ताण पडतोय त्यामुळे आपल्या पशुधनाबरोबर जंगली प्राणी पशु पक्षीच्याही आरोग्याचा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतेय.






