Photo Credit- Social Media लाडकी बहीण योजनेतील आठ लाख महिलांना आता १५०० ऐवजी फक्त ५०० रूपयेच मिळणार
मुंबई: राज्यातील सुमारे ८ लाख लाभार्थी महिलांना आता ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा केवळ ५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे. याचे कारण असे की, या बहिणींना यापूर्वीच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून दरमहा १,००० रुपये मिळत आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नियमांनुसार, लाभार्थ्यांनी अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणे शक्य आहे; मात्र एकूण मिळणारा मासिक लाभ १,५०० रुपयांच्या वर जाऊ नये, असा अट आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. या योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी अर्जांची पुन्हा एकदा छाननी केली जात आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये या योजनेसाठी सुमारे २.६३ कोटी अर्ज प्राप्त झाले होते. प्राथमिक पडताळणीनंतर ११ लाख अर्ज अपात्र ठरवले गेले असून, पात्र अर्जांची संख्या २.५२ कोटींवर आली आहे.
IPL 2025 :राजस्थानकडून ‘हा’ १३ वर्षीय खेळाडू करणार राडा! आरआरने दिले संकेत, पहा व्हिडिओ
फेब्रुवारी आणि मार्च २०२५ या महिन्यांत २.४६ लाख महिलांच्या खात्यात योजनेअंतर्गत निधी जमा करण्यात आला आहे.सध्या राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आलेल्या अर्जांची पुन्हा तपासणी सुरू असून, पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात पुढील हप्ता लवकरच जमा केला जाईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट संकेत दिले होते की, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची सखोल पडताळणी केली जाणार आहे. त्यांनी असेही सांगितले होते की, अर्जांची तपासणी झाल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या सुमारे १० ते १५ लाखांनी कमी होण्याची शक्यता आहे. योजनेचे निकष अथवा निधीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून, फक्त पात्र महिलांनाच हप्ता मिळावा यासाठीच ही प्रक्रिया राबवली जात आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले होते.
मोठी बातमी ! एनडीएसोबत असलेल्या ‘या’ पक्षाने सोडली साथ; नवीन घोषणा करत म्हटलं
‘नमो शेतकरी योजना’चा लाभ घेणाऱ्या सुमारे आठ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत यापुढे दरमहा फक्त ५०० रुपये मिळणार आहेत. याआधी त्यांना एकूण १५०० रुपयांचा लाभ मिळत होता. मात्र, ‘लाडकी बहीण’ योजनेनुसार, एकाच लाभार्थ्याला विविध शासकीय योजनांमधून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याची एकूण मर्यादा मासिक १५०० रुपये इतकी आहे.
या महिलांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून वर्षभरात ६,००० रुपये मिळतात. याशिवाय, केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेतूनही आणखी ६,००० रुपयांचा लाभ मिळतो. म्हणजेच या महिलांना एकूण १२,००० रुपये दरवर्षी आधीच शासकीय योजनांमधून मिळत आहेत. त्यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत त्यांना उरलेले ६,००० रुपयेच मिळणार असून, त्याचा मासिक हप्ता ५०० रुपये इतका असेल.
राज्य सरकारने २०२३ मध्ये केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’च्या धर्तीवर ‘नमो महासन्मान निधी’ योजना सुरू केली होती. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत वार्षिक ६,००० रुपयांची मदत दिली जाते. प्रत्येक चार महिन्यांत दोन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होतात.