Photo Credit- Social Media महाविकास आघाडीच्या नेत्यांचा शपथविधीवर बहिष्कार
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारसभांचा धुराळा उडू लागला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणकीचा अर्ज भरताना शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा फोन आला होता. त्यांनी 8 आमदार बंडाच्या तयारी असल्याचे सांगितलं, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, शिंदे गटातील एक मंत्री आणि आठ आमदार ठाकरे गटात येणार होते. विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना शिंदे गटातील बड्या नेया फोन आला होता. त्यांनी त्यांच्यासह आणखी 8 आमदार बंड करण्याच्या तयारीत असल्याचे सिगितेल होते. उद्धव ठाकरे यांची माफी मागून पुन्हा पक्षात येण्याची त्यांनी तयारीही दर्शवली होती. असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पण आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही, असेही आपण त्यांना सांगितल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
हेही वाचा: India First Hyderogen Train: डिझेल नाही, वीज नाही यावेळी चक्क पाण्यावर चालणार ट्रेन
आदित्य ठाकरेंच्या या दाव्यानंतर आता ठाकरे गटात येणारे ते आमदार नेमके कोण होते. अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दरम्यान, त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावरही निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेकजण पक्ष बदलत आहेत. विचारधारा बदलत आहेत. पण या लोकांनी थेट पक्ष फोडला, पक्षाचं नाव, चिन्ह चोरलं, आजही माझ्या आजोबांचे फोटो वापरून प्रचार करत आहेत. माझ्या बाबांनी त्यांचे फोटो काढले. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही मोठा गौप्यस्फोट केला होता. शिवसेना फोडून एकनाथ शिंदे सुरतला गेले. त्यावेळी ते पुन्हा माघारी फिरण्यास तयार होते. पण मारी फिरल्यास ते मला मारून टाकतील, असही त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं.
हेही वाचा: बिग बॉसच्या घरात टाइम गॉड बनण्याच्या शर्यतीत हे तीन स्पर्धक, विवियनच्या ग्रुपवर संकट