Photo Credit : Social media
पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण आता या योजनेवरून शिंदेगट आणि अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. योजना जाहीर केल्यापासून या योजनेचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही गटात रस्सीखेच सुरू आहे. अशातच शिंदे गटाने अजित पवार यांच्यावर योजनेचे नाव बदलून प्रचार केल्याचा आरोप केला आहे.
हेदेखील वाचा : MTNL-BSNL एकत्र झाल्यानंतर चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचे नाव बदलून ‘माझी लाडकी बहीण’ या नावाने प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून केला जात आहे. इतकेच नव्हे तर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनीही अजित पवरांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकल्याची माहितीही समोर आली आहे.
हेदेखील वाचा : जगातील चार विकसनशील देशांपैकी एक देश अधिक गरीब होणार – अर्थमंत्री सीतारामन
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यातील आंबेगाव तालुक्यात जनसन्मान यात्रा काढली जाणार आहे. पण आंबेगाव शिरूरच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ याऐवजी ‘माझी लाडकी बहीण’ या नावाने बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर मुख्यमंत्री हा शब्द वगळल्याने शिंदे गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीच्याच बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. राज्यात महायुतीचे सरकार असतानाही या योजनेतून मुख्यमंत्री या नावाला बगल का दिली जात आहे, असा सवाल शिंदे गटाकडून उपस्थित होत आहे.