File Photo : Old Pension Scheme
अमरावती : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहे. 1982 ते 1984 जीपीएसह जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी आज पुन्हा अमरावती जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने जुनी पेन्शनधारक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन करत सरकारच्या नकारात्मक धोरणाचा निषेध केला. हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढल्यानंतर सरकारने आश्वासन दिलं. तर नंतर 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला. यावेळी सुद्धा आश्वासन दिलं. मात्र, तरीदेखील दखल न घेतल्याने आज पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
तसेच ‘जे सरकार आम्हाला जुनी पेन्शन लागू करणार, त्यालाच आमच्या परिवारातील मतदान देण्यात येईल’, असा अभियान आमच्या संघटनेच्या वतीने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर राबवण्यात येईल. तर यावेळी आमदार ज. मो. अभ्यंकर यांनीही जुनी पेन्शन संघटनेच्या आंदोलनाला भेट देत पाठिंबा दिला.