फोटो सौजन्य- iStock
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. 10 दिवसांनी म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 रोजी लोकशाहीचा उत्सव म्हणजेच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या मतदानामध्ये सहभागी होण्याकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त 12 प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य असतील असे स्पष्ट केले आहे. या 12 प्रकारच्या ओळपत्रांपैकी कोणताही एक पुरावा तुम्ही तुमच्यासोबत ठेवलात तर तुम्ही मतदान करु शकतात अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.जाणून घेऊया याबद्दल
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकतात. मात्र जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा मतदानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
एखाद्या मतदाराकडे मतदानावेळी निवडणूक ओळखपत्र नसल्यास 12 प्रकारच्या पुराव्यांपैकी एक पुरावा असणे आवश्यक आहे.
12 ओळखपत्रे पुरावा
हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.
मतदारांसाठी महत्वाच्या सूचना
एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यातमध्ये बदल केला असेल, मात्र त्याला अद्याप नवीन मतदार ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती – चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.