लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट (फोटो- टीम नवराष्ट्र )
मुंबई: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने महिलांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. सरकारसाठी ही योजना गेमचेंजर ठरली आहे. या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत झाल्याचे म्हटले जाते. आता महायुतीचे सरकार असून, फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान याच योजनेबाबत सरकार महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. दरम्यान मे महिन्याचे पैसे अजूनही महिलांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. मे महिन्याचे पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मे आणि जून महिन्याचे पैसे एकदमच महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. सरकार याबबतीत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
जून महिन्याच्या 10 तारखेला वटपौर्णिमा आहे. हा सण महिलांसाठी विशेष असतो. त्यामुळे कदाचित वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर मे आणि जून महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच महिलांच्या खात्यात एकदम 3 हजार रुपये जमा केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दहावा हफ्ता आता…
अर्जांची केली जातीये पुनर्तपासणी
प्रत्येक जिह्यात महिला व बालविकास विभागाकडून अर्जाची पुनर्तपासणी केली जात आहे. आतापर्यंत राज्यात 11 लाख लाडक्या बहिणी यासाठी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. महिलांची नावे वगळण्यात येत असल्याने दर महिन्यात यातील लाभार्थी आकडे बदलत आहेत. तर संभाजीनगर जिल्ह्यात ९ लाख ३२ हजार २५० महिला या योजनेसाठी सध्या लाभ घेत आहेत.
2100 रुपयांची प्रतीक्षाच
विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरकारने ही रक्कम १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अर्थसंकल्पात याबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम वाढविण्यात येईल, असे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. यासाठी लाभार्थी महिलांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
1500 की 500 रुपये?
शासकीय योजनांचा आर्थिक लाभ मिळवणाऱ्या महिलांना ५०० रुपये देण्याबाबतही कार्यवाही सुरु झाली आहे. ज्या महिलांना शेतकरी सन्मान योजनेंतर्गत वर्षाला 12 हजार मिळतात, त्यांना आता लाडकी बहीण योजनेत 500 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.