कर्जत : आमदार रोहित पवार यांनी शासन स्तरावर केलेल्या विशेष प्रयत्नातून शेतकऱ्यांसाठी अनुदानित यांत्रिकीकरणासाठी कोट्यवधींची मदत शासनाकडून मिळाली आहे. त्या यांत्रिकीकरणाचा वितरण सोहळा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते कर्जत तालुक्यातील राशीन येथे पार पडला.
या कृषी यांत्रिकीकरणामध्ये 65 ट्रॅक्टर तर 338 इतर औजरांचेही वाटप करण्यात आले. ठिबकसाठी 1485 शेतकऱ्यांना एकूण 2.95 कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. याबरोबरच कांदा चाळीसाठी 4.65 कोटी रुपये तर शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी 1.15 कोटी रुपये अनुदान मिळाले आहे.
शासनस्तरावर आमदार रोहित पवार यांनी याविषयी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कोट्यवधींचे अनुदान मंजूर झाल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
[read_also content=”शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं, भाजप जवळच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ https://www.navarashtra.com/maharashtra/sharad-pawar-should-be-the-prime-minister-excitement-due-to-statements-made-by-leaders-close-to-bjp-nrdm-263473.html”]
मतदारसंघातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी अनिल गवळी, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, राशीनचे मंडळ कृषी अधिकारी संदीप पवार, कुळधरणचे मंडळ कृषी अधिकारी संजय घालमे हे उपस्थित होते.