पुणे: सासऱ्याने नातीसमोरच सुनेची हत्या (Pune Murder News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाफगाव (Pune Crime News) येथे ही भयानक घटना घडली आहे. सासऱ्यांचे बाहेर एका महिलेशी अनैतिक प्रेम संबंध होते. त्यासाठी सुनेचा विरोध असल्याने सासऱ्यांनी तिचा काटा काढण्याचं ठरवलं आणि तिचा खून केला. (Father In Law Killed Daughter In Law)
दिनकर कोळी असं आरोपी सासऱ्याचं नाव आहे. दिनकर कोळी याचे एक महिलेशी अनैतिक प्रेम संबध होते. या प्रेम संबधांना सुनेने वारंवार विरोध केला होता. मात्र सुनेचा विरोध सासऱ्याला मान्य नव्हता. सून आपल्याला विरोध करते या रागातून सासरा दिनकर कोळी याने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत सुनेची हत्या केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या चिमुकल्या नातीच्या समोरच सासऱ्याने आपली सून मेघा कोळीची हत्या केली. मेघाच्या तोंडात बोळा कोंबून आणि गळा आवळून दिनकर कोळी यांनी ही हत्या केली. या प्रकरणी दिनकर कोळी याच्यावर राजगुरुनगर पोलिसांत (Rajgurunagar Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.