मत्स्यमंत्री नितेश राणे यांनी भायखळा येथील भाऊचा धक्का बंदराला भेट दिली (फोटो सौजन्य - एक्स)
मुंबई : राज्यामध्ये सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. याचा किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. जनजीवन विस्कळीत झाले. त्याचबरोबर मासेमारी व्यवसायावर देखील मोठा परिणाम झाला आहे. यावरुन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मत्स्यमंत्री नितेश राणे यांनी आज (दि.28) भायखळा येथील भाऊचा धक्का बंदराला भेट दिली. मंत्र्यांनी अचानक दिलेल्या या भेटीमध्ये त्यांनी मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्याचबरोबर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.
भाऊचा धक्क्यावर कोळी बांधवांकडून मासेविक्री चालते. अलिबागला जाणाऱ्या फेरी बोट इथून सुटतात. आज अचानक नितेश राणे यांनी भाऊचा धक्का बंदराला भेट दिली. त्यांनी भाऊचा धक्का येथील स्थानिक मच्छीविक्रेत्या भगिनींना बांगलादेशी व घुसखोर रोहिंग्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेची तातडीने दखल घेत त्यांनी भाऊचा धक्का येथे भेट देऊन स्थानिक मच्छीमार बांधवांशी संवाद साधला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तेम्हणाले की, घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांकडून भाऊचा धक्का येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचा पारंपरिक व्यवसाय गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. त्याचबरोबर मुंबईतील दहिसर येथील गणपत पाटील नगर परिसरातील हिंदू कुटुंबावर काही समाजकंटकांकडून हल्ला झाला. या हल्यात गुप्ता कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाला असून जखमी असलेल्या दोन सदस्यांवर उपचार सुरू आहेत. आज गुप्ता कुटुंबीयांची भेट घेतली.
भाऊचा धक्का येथील स्थानिक मच्छीविक्रेत्या भगिनींना बांगलादेशी व घुसखोर रोहिंग्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला. या घटनेची तातडीने दखल घेत आज भाऊचा धक्का येथे भेट देऊन स्थानिक मच्छीमार बांधवांशी संवाद साधला.
दरम्यान, घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांकडून भाऊचा धक्का येथील… pic.twitter.com/EitiYT7cDL
— Nitesh Rane (@NiteshNRane) May 28, 2025
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, म्हणून हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते इथे आज आलो. केंद्र सरकारने कडक नियम लावले आहेत. एकही बांगलादेशी रोहिंगा इथे राहता कामा नये. हिरव्या सापांची वळवळ भाऊच्या धक्क्यावर खपवून घेणार नाही. यापुढे भाऊच्या धक्क्यावर बारीक लक्ष असेल” असं नितेश राणे म्हणाले. “हे कराचीच बंदर नाही. भाऊचा धक्का आहे. प्रत्येक कागद पत्र तपासली जातील. बांगलादेशींवर कडक कारवाई केली जाईल” असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “स्वातंत्र्य वीर सावकारांनी सांगितलं होतं हिंदुना हिंदूंकडून त्रास आहे. आमच्या कडचे जे मदत करतात, त्यांनी विचार करावा. आपण कोणत्या हिरव्या सापांना मदत करतो याचा विचार आपल्यातल्या लोकांनी करावा. योग्य ती पडताळणी करूनच इथे बसू द्यायची जबाबदारी घ्या. पश्चिम बंगालमधून खोट्या कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी आणि रोहिंगे या ठिकाणी येतात तर कारवाई का नाही? इथे फक्त हिंदू काम करतील. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना स्थान नाही. अशा लोकांना समुद्रमार्गे पाकिस्तानात त्यांच्या अब्बाकडे पाठवायची सोय करू, अशा गंभीर शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी इशारा दिला आहे.