मुंबई : गेल्या आठवड्यात अचानक अजित पवार नॉट रिचेबल झाले होते, तेव्हा चर्चांना उधाण आलं होत. त्यामुळं अजित पवार भाजपात प्रवेश करणार का? अजित पवार पक्षात नाराज आहेत का? अजित पवार हे भाजपामध्ये जाणार अशी सुद्धा चर्चा सुरु आहे. दरम्यान, आज आमदारांची अजित पवार (Ajit Pawar) बैठक घेणार असल्याची कालपासून बोललं जात आहे. मात्र अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षातच नाराज आहेत का? त्यांची पक्षात घुसमट होते का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यातच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांनी पाठिंबा दिला आहे. दादा जे भूमिका घेतील, ती आम्हांला मान्य आहे असं या आमदारांनी म्हटलं आहे. तर धनंजय मुंडे हे देखील नॉच रिचेबल आहेत, त्यामुळं अजूनच तर्कवितर्क काढले जाताहेत. तर राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदारांचा अजित पवारांचा पाठिंबा असल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनं खळबळ माजली आहे.
राष्ट्रवादीचा 53 पैकी 40 आमदारांचा अजित पवारांचा पाठिंबा?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा 53 पैकी 40 आमदारांचा अजित पवारांचा पाठिंबा असल्याचं द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानं म्हटलं आहे. त्यामुळं राज्यात खळबळ माजली असून, या वृत्ताला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आण्णा बनसोडे यांनी दुजोरी दिला आहे, चाळीस पेक्षा अधिक आमदार हे अजित पवारांसोबत असलीत, असं बनसोडेंनी म्हटलं आहे. दरम्यान, अजित पवार हे आज मुंबईत विधानभवनात बैठक देखील घेणार असल्याचं बोललं जातंय. अजित पवार जो निर्णय घेतली, तो आम्हाला मान्य असं देखील काही राष्ट्रावादीच्या आमदारांनी म्हटलं आहे. त्यामुळं अजित पवार भाजपात जाणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
धनंजय मुंडे नॉट रिचेबल..
किती आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा?
दरम्यान, अजित पवार जर उद्या भाजापासोबत गेले तर, भाजापला मोठी शक्ती मिळेल. त्यामुळं भाजपाला आणखी बळकटी मिळेल, पण अजित पवार हे एकटे जाणार नसून त्यांना अनेक आमदारांचा पाठिंबा असल्याचं बोललं जातंय. नाशिक, सिन्रर तसेच अनेक भागातून अनेक आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शविला आहे. “दादा जे भूमिका घेतील, ती आम्हांला मान्य आहे, असं या आमदारांनी म्हटलं आहे.” नितीन पवार, अण्णा बनसोडे तसेच कोकाटे हे अजित पवारांसोबत जाणार आहेत. त्यांनी जाहीरपणे पाठिंबा देखील जाहीर केला आहे.