Gang busting closed company in Pimpri-Chinchwad industrial city
Follow Us:
Follow Us:
पिंपरी : उत्तर प्रदेश येथून येऊन पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात रेकी करून चोऱ्या करणाऱ्या एका टोळीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 24 लाख 45 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या टोळीतील प्रमुख गन्हेगारांनी अल्पवयीन मुलांची टोळी बनवून त्यांच्या माध्यमातून चोऱ्या केल्याचे उघडकीस झाले आहे.
अब्दुलकलम रहिमान शहा (23, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश), योगेश तानाजी चांदणे (26, रा. जाधववाडी, चिखली), रविशंकर महावीर चौरासिया (23, रा. मोईगाव, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचेसाथीदार रिझवान खान, शकील मन्सुरी आणि दोन अल्पवयीन मुलांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून औद्योगिक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेहोते. त्याबाबत चिखली पोलीस वारंवार ठिकठिकाणी सापळा लावत होते. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनीएक पथक तयार करून घरफोडी झालेल्या ठिकाणांची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषण करण्याच्या सूचना पथकाला दिल्या. यापथकाला गुन्हा घडलेल्या ठिकाणी येणारे संशयित आरोपी इतर ठिकाणी देखील दिसले. त्यानुसार त्यांची ओळख पटवून अब्दुलकलामयाला चिखली पोलिसांनी अंगणवाडी चौक, चिखली येथून ताब्यात घेतले. तो चोरीचा माल विक्रीसाठी आला होता.
त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात चोऱ्या केल्याचे सांगितले. चोरलेला माल वाहून नेण्यासाठी आरोपी योगेश चांदणे याचा टेम्पो वापरत असत. पोलिसांनी योगेश चांदणे आणि रविशंकर चौरासिया या दोघांना टेम्पोसह ताब्यातघेतले. आरोपींकडून ग्राइंडर मशीन, पोपट पाना, चार्जेबल ट्यूब लाईट, ब्युटेन गॅस गन, लोखंडी छन्न्या, कुऱ्हाडीचे पाते, ड्रीलमशीन, स्टील बोल्ड कटर, हेक्सा फ्रेम, टी पाना, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असे घरफोडीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
चिखली, चाकण, कोंढवा, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपींनी चोरीचे एकूण आठ गुन्हे केले आहेत. त्यात त्यांनी 52 लाख 65 हजार 958 रुपये किमतीचा ऐवज चोरला आहे. पोलिसांनी आरोपींकडून 24 लाख 45 हजार 140 रुपये किमतीचा मुद्देमालहस्तगत केला आहे.
आरोपी हे मुळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. त्यांनी अल्पवयीन मुलांचा समावेश असलेली एक गुन्हेगारी टोळी बनवली आहे. तेटोळीने पुणे शहरात येतात. एका ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहतात. त्यानंतर परिसरात रेकी करतात. विशेषतः ही टोळी बंदअसलेल्या कंपन्यांमध्ये चोरी करते. रेकी करून बंद असलेल्या कंपन्यांमध्ये चोरी करत आणि चोरीचा माल टेम्पोतून लंपास करत असत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीसनिरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद, पोलीस अंमलदार बाबा गर्जे, सुनील शिंदे, चेतन सावंत, विश्वास नाणेकर, भास्कर तारळकर, संदीप मासाळ, दीपक मोहिते, अमर कांबळे, कबीर पिंजारी, संतोष सकपाळ, संतोष भोर यांनीकेली.
Web Title: Gang busting closed company in pimpri chinchwad industrial city busted 24 lakh copper seized nryb