पुणे : तरुणीशी ओळख झाल्यानंतर तिला बोपदेव घाटात नेहून धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बजरंग जयवंत रुमाले (वय २१) आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणीचे आजोबा नांदेड येथे राहायला होते. आजोबांचे निधन झाल्याने ती नांदेडला गेली होती. नांदेड येथे आरोपी रुमालेशी तिची ओळख झाली. आजोबांच्या निधनानंतर तरुणी पुण्यात परतली. त्यानंतर रुमाले व त्याचा मित्र पुण्यात आले. तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणीला धमकावून रुमालेने बोपदेव घाटात नेले. तिच्यावर बलात्कार करुन अनैसर्गिक कृत्य केले. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.