सासवड : श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Dnyaneshwar Maharaj) राष्ट्रीय महामार्ग (Mahamarg) क्रमांक ९६५ या महामार्गावरील विविध प्रश्नांबाबत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये या महामार्गावरील प्रत्येक गावच्या थांब्याच्या ठिकाणी भूमिगत रस्ते होणार असून शेतकऱ्यांना झाडे, घरे, पाईपलाईन, गोठे आदींची नुकसान भरपाई देण्याबाबत आ. जगताप यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हा आळंदी ते पंढरपूर असून या महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावरील गावांचे थांबे, अपघातग्रस्त ठिकाणे, पूल या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून अंडरपास रस्ते तसेच आवश्यक उपाययोजना करण्याबाबत आमदार जगताप यांनी सूचना दिल्या. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम, तांत्रिक व्यवस्थापक अनिल गोरड, महामार्ग अधिकारी फारूक सय्यद, अभियंता नवीन शंकर, अजय पाटील, राजेंद्र ढगे, सिद्धार्थ अवधूत, मयूरेश कोकाटे भूषण नाईकवडी आदी उपस्थित होते.
याबरोबरच दौंडज खिंड परीसरातील शेतकऱ्यांची राहती घरे नुकसानग्रस्त होत असून याचीही पूर्ण नुकसान भरपाई देण्याची सूचना आ. जगताप यांनी केली. दौंडज आणि वाल्हे येथे २६ ते ३० जानेवारी पर्यंत संबंधित अधिका-यांनी थांबून घरे, झाडे, गोठे, विहीरी, जलवाहिन्या आदी नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करणे तसेच तातडीने नुकसान भरपाई मिळण्याबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही आ. जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
दौंडज खिंडत ४० फूट उंचीचे पथदिवे उभारा
तसेच दौंडज खिंड परीसरात रस्ता आणि नागरीकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार यासाठी ४० फूट उंचीचे विजेचे खांब टाकण्याचे आदेश आ. जगताप यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पोमण, महिलाध्यक्षा सुनिता कोलते तसेच महामार्गावरील शेतकरी उपस्थित होते.
[blockquote content=”अपघातांना आळा बसण्यासाठी झेंडेवाडी, काळेवाडी, ढुमेवाडी, जाधववाडी, दिवे, चिंचावले बेलसर फाटा, वाल्हे – मुर्टी फाटा, वाल्हे पालखी तळ या सर्व गावांच्या थांब्यांंच्या ठिकाणी भूमीगत रस्ते करणे. तसेच झेंडेवाडी ते दिवे, खळद फाटा – इंग्लिश स्कूल ते शिवरी स्टँड – शिवरी हायस्कूल तसेच वाल्हे हायस्कूल – वागदरवाडी, वाल्हे पालखी तळ ते कामठवाडी या ठिकाणी सेवा रस्ते करण तसेच कामठवाडी येथील नागरीकांना, विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी चालत जाण्यासाठी पूल उभारावेत.” pic=”” name=”- संजय जगताप, आमदार.”]