मुंबई: शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) भलेही परवानगी मिळालेली असली तरी त्यांच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या शिवसेना पक्षचिन्हासंदर्भातील निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका बसणार आहे. दसऱ्याच्या आधी किंवा दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar In Shinde Group) शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी याविषयी भाष्य केलं आहे.
[read_also content=”आता इटंरनेट सुसाट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5G इटंरनेट सेवेचा शुभारंभ https://www.navarashtra.com/india/launch-of-5g-internet-service-by-prime-minister-narendra-modi-nrps-331619.html”]
मिलिंद नार्वेकर शिंदे गटामध्ये सामील होतील, असा दावा पाटील यांनी केला आहे. शिवसेना आमचीच आहे. धनुष्यबाणाचं चिन्ह आमच्याकडे आल्यावर उरलेले आमदारही शिंदे गटामध्ये येतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
गुलाबराव पाटील यांच्या मिलिंद नार्वेकरांबाबतच्या वक्तव्यानंतर शिवसेनेमध्ये खळबळ उडाली आहे. गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात असं म्हटलं आहे की, मिलिंद नार्वेकर शिंदे गटामध्ये सामील होतील. ठाकरेंकडे १५पैकी ५ आमदारही उरणार नाहीत. आता फक्त आम्हाला धनुष्यबाणाचं चिन्ह मिळणं बाकी आहे.