आमदार गणपत गायकवाड यांनी कट रचून गोळीबार केला. हे पोलिसांचे म्हणणे अतिशय हास्यास्पद आहे. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांनी अतिक्रमण आणि बांधकाम तोडण्यासंदर्भातील तक्रार केली होती. ती तक्रार घेण्यास पोलिसांनी उशीर केला. त्यामुळे त्वरीत कारवाई केली असती तर हे प्रकरण घडले नसते असे आमदार गायकवाड यांच्या वकिलांचे म्हणणे आहे. गायकवाड सह पाचही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पाचही जणांची रवानवगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.
हिललाईन पोलिस ठाण्यात द्वारली येथील जागेच्या वादातून आमदार गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर आमदार गायकवाड यांनी स्वत: गोळीबार केल्याची कबूली दिली होती. तसेच या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही समोर आला होता. पोलिासांनी गायकवाड यांच्या सह प्रमथ तीन जणाना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने १४ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंत या प्रकरणात आणखीन दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. आमदार गायकवाड यांच्यासह पाचही जणांन आज उल्हासनगर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या पाचही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या पाचही जणांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.
या वेळी बचाव पक्षाचे वकील निलेश पांडे यांनी सांगितले की, न्यायालयात आज पुन्हा पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. सर्व मुद्दे तपासून न्यायालायने पोलिस कोठडी देणे नाकारुन पोलिस कोठडीची गरज भासत नसल्याने न्यायालयीन कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलिस करतील पहिल्याच वेळी गायकवाड यांनी कट रचून हा गोळीबार केल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षाने केला होता. हे तपास यंत्रणेचे काम आहे. त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. जसे सगळयांना माहीती आहे की काय घडले. त्याला कट रचने म्हणार की, मानवी रिअ’क्शन म्हटले जाते. कट रचण्यासाठी काय काय गोष्टी लागतात. हे सगळ्यांना माहिती आहे. सिनिअर पीआयच्या केबीनमध्ये कट रचून गुन्हा करतो हे हास्यास्पद आहे. पोलिसांनी जी कामगिरि बजावयला हवी होती. पहिली एफआयआर नोंदविली गेली आहे. ती अतिक्रमण आणि बांधकाम तोडण्यासं दर्भात तक्रार नोंदविण्यासाठी गेले होेते. या प्रकरणाची एफआयआर गोळीबार प्रकरणाचा आधी नोंदविली गेली असती तर हा प्रकार घडलाच नसता.