डोंबिवली : दुसऱ्याची रिक्षा भाड्याने चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे एका रिक्षा चालकाने रिक्षा चोरली. ती रिक्षा देखील खराब झाली. या रिक्षा चालकाने पुन्हा दुसरी रिक्षा चोरली. काही दिवसानंतर बबलू पवार या नावाच्या रिक्षा चालकास कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे. बबलू हा अंबरनाथ तालुक्यातील भाल गावातील राहणारा आहे. रिक्षा नंबर बदलून तो दररोज भाल ते कल्याण दरम्यान रिक्षा चालवित होता. त्यातून मिळणाऱ्या कमाईमध्ये तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.
कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला एका व्यक्तीने फोन करुन माहिती दिली की, एक रिक्षा चालक कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या रुणवाल गार्डनसमोर भाडे घेण्यासाठी उभे आहे. त्याचा रिक्षा नंबर चुकीचा आहे. त्याने ही रिक्षा चोरली आहे. क्राईम ब्रांचचे पोलीस कर्मचारी गुरुनाथ जरक आणि मिथून राठोड हे दोघे मिळालेल्या माहितीनुसार त्या जागेवर पोहचले. त्याठिकाणी रिक्षा नंबर एमएच ०५ डीजी-२२ ८९ नंबरची रिक्षा उभी होती. त्या रिक्षा चालकाला त्याचे नाव विचारले. त्याने त्याचे नाव बबलू पवार असे सांगितले. त्याच्याकडे रिक्षाचे कागदपत्र दाखविण्याचे सांगितले. तेव्हा त्याच्याकडे रिक्षाचे कागदपत्रे नव्हती.