कोकणातील आंबा बागायतदारांचे नुकसान (फोटो- istockphoto/सोशल मिडिया)
रत्नागिरी: गेले काही दिवसांपासून राज्यात अवकाळी आणि त्यानंतर मान्सून सुरू झाला आहे. राज्यभरात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या पावसाने कोकणातील बागायतदायर आणि राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात खास करून आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाने कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकम बागायतदारांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोकणात आंबा, काजूचा हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपल्याने २० मे पासून सुरू झालेल्या पावसाचा फटका या पिकांना बसला नाही. मात्र, कोकणात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोकम म्हणजे रतांबा पिकाला नियोजित वेळेपूर्वी दाखल झालेल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. कोकणात कोकम पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याचा हंगाम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो.
Pune Rain Update: पुण्यात पावसाने उडवली दाणादाण; रेड अलर्ट जारी, अजित पवारांनी घेतला आढावा
मे महिन्यात कोकम काढणीस तयार होतात. मात्र, २० मे पासून पाऊस सुरू झाल्याने कोकमच्या फळात पाणी जाऊन ते झाडावरून पडून कुजून गेले आहे. तरीही बागायतदार वर्ग योग्य असलेली रतांबा घरी आणून कोकम तयार करीत आहेत. एकंदरीत पावसामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून, कोकमचा दर ४०० रु. किलो होण्याची शक्यता आहे.
कोकणात पावसाचा हाहाःकार
कोकणात पावसाची तुफान बॅटींग सुरु आहे. अशातच आता कर्जत तालुक्यातील बिरदोले गावातील 27वर्षीय तरुण रोशन कचरू कालेकर या तरुणाचे अंगावर वीज पडल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला.उल्हास नदी जवळ शेती असल्याने रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पुर आला होता.या पुरामध्ये शेतीचे कोणते नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी हा तरुण गेला असताना ही दुर्घटना घडली.
नेरळ कळंब रस्त्यावरील बिरदोले या गावाच्या मागील बाजूने उल्हास नदी वाहते.रात्री सर्वत्र ढग फुटी सदृश पाऊस झाल्याने उल्हास नदीला अचानक पूर आला.आज पहाटे सर्वांना जाग आली ती विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट यातून जाग आली.त्यावेळी प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू होता.
राज्यात पावसाचा जोर वाढणार
पुणे आणि इतर अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील तीन दिवसही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. पुणे जिल्ह्यात काही भागांमध्ये ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.