मुंबई : राज्यात सध्या पोलीस भरतीची (Police Bharti) प्रक्रिया अनेक ठिकाणी सुरु आहे. शारिरीक तसचं लेखी परीक्षाही होतायेत. यात मुंबईत झालेल्या ७ मे रोजीच्या लेखी परीक्षेत हायटेक कॉपी (Hi-Tech Copy) करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. स्पर्धा समिती संघटनेच्या वतीनं हा आरोप करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. परीक्षार्थींनी परीक्षा सुरु असताना, बटन कॅमेराच्या सहाय्यानं या प्रश्नपत्रिकांचे फोटे काढून ते मोबाईलवर बाहेर पाठवल्याचा आरोप आहे. बाहेर असणाऱ्या काही मार्गदर्शक आणि शिक्षकांनी या प्रश्नांची उत्तरं त्यांना मायक्रो हेडफोनच्या सहाय्यानं परीक्षा सुरु असताना सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय.
नेमकी किती आहे हायटेक कॉपीची व्याप्ती?
राज्यातल्या ७८ हजार इच्छुकांनी ही पोलीस भरतीची परीक्षा दिल्याचं सांगण्यात येतंय. त्यातील शेकडो विद्यार्थी या हायटेक कॉपी प्रकरणात सहभागी झाले असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. राज्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थीही या परीक्षेला बसलेले आहत. त्यात आता हा प्रकार समोर आल्यानं आता या लेखी परीक्षेचं पुढं काय होणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
बटन कॅमेरा आणि मायक्रो हेडफोनच्या सहाय्यानं कॉपी
परीक्षा केंद्रात गेले परीक्षार्थींनी बटन कॅमेराचा वापर करत या प्रश्नपत्रिकांचे फोटे काढून ते बाहेर पाठवल्याची माहिती आहे. त्यानंतर बाहेर बसलेले शिक्षकांनी अवघ्या काही मिनिटांत या प्रश्नांची उत्तरं या परीक्षार्थींना त्यांच्या कानात घातलेल्या मायक्रो हेडफोन्समध्ये सांगितल्याचा हा प्रकार आहे. हे छोट्या आकाराचे हेडफोन्स कुणाच्याही लक्षात येत नाहीत. यापूर्वी स्पर्धा परीक्षेतही असे हायटेक कॉपीचे प्रकार समोर आले आहेत.
हजारो परीक्षार्थींचं भवितव्य टांगणीला
हजारो विद्यार्थी राज्यात पोलीस भरतीसाठी उत्सुक आहेत. त्यात हा प्रकार समोर आला आहे. यामागे मोठी टोळी सक्रिय असल्याचं सांगण्यात येतंय. त्यात पैसे घएून अशा प्रकारे कॉपी करुन परीक्षार्थींना पास करण्याचं मोठं षडयंत्र असल्याचं मानण्यात येतंय. हा प्रकार समोर आल्यानं हजारो परीक्षार्थींचं भवितव्य टांगणीला लागल्याचं सांगण्यात येतंय.
मुंबई पोलिसांनी घेतली गंभीर दखल
परीक्षा सुरु होती त्या ठिकाणाहून पाठवलेल्या या प्रश्नवपत्रिकांचे फोटो मिळाल्याचा दावा एबीपी माझा या वृत्त वाहिनीनं केला आहे. या आरोपांची गंभीर दखल मुंबई पोलिासंनी घेतली असून स्पर्धा समिती संघटनेकडं याबाबतचे पुरावे मागण्यात आल्याची माहिती आहे. आता या प्रकरणात मुंबई पोलीस ही परीक्षा रद्द करणार का, असा प्रश्न विचारण्यात येतो आहे.