भोसले घराण्याची तलवार महाराष्ट्रात परतणार (फोटो -ट्विटर)
Maharashtra Historical News: महाराष्ट्राला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्यानंतर मराठा साम्राज्यातील एक महत्वाच्या घराण्याची तलवार लवकरच महाराष्ट्रात परतणार आहे. नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लवकरच महाराष्ट्रात येणार आहे.
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात परतणार आहे. ही तलवार राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे लंडनमध्ये सुपूर्त करण्यात आली आहे. मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. १६ ते १८ ऑगस्ट पर्यंत ही तलवार महाराष्ट्रात परतणार आहे.
या ऐतिहासिक तलवारीचा लंडनमध्ये लिलाव करण्यात आला होता. अत्यंत कमी कालावधीत महाराष्ट्र सरकारने या लिलावात ही तलवार जिंकली होती. ही तलवार महाराष्ट्रात पुन्हा येण्यासाठी राजे रघुजी भोसले यांच्या वंशजानी देखील पाठपुरावा केला होता. अखेरनं ही ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात परतणार आहे.
आशिष शेलारांचे ट्विट काय?
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील थोर सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारने लिलावातून जिंकली होती, लंडनहून ही शौर्याची निशाणी आता आपल्या मातीत परत येणार असून, हा महाराष्ट्राचा विजय आहे. ही तलवार म्हणजे मराठ्यांच्या शौर्याची, मुत्सद्देगिरीची आणि वैभवाची अमूल्य निशाणी असून, अशा लिलावात पहिल्यांदाच आपण ऐतिहासिक वारसा जिंकून आणलेला आहे.
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण!
छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील थोर सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारने लिलावातून जिंकली होती, लंडनहून ही शौर्याची निशाणी आता आपल्या मातीत परत येणार असून, हा महाराष्ट्राचा विजय आहे. ही तलवार… pic.twitter.com/Y6CVojp2d0— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 11, 2025
या ऐतिहासिक तलवारीचा लिलाव जिंकण्यापासून ते ती ताब्यात घेण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे मार्गदर्शन आणि भूमिका असलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, भारताचे परराष्ट्र मंत्रालय, लंडन येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सर्व अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार!
मुख्यमंत्री फडणवीसांची पोस्ट काय?
आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव असलेली, नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ही लिलावात निघाली होती. ती राज्य सरकारने 29 एप्रिल रोजी खरेदी केल्यानंतर, आज त्याचा प्रत्यक्ष ताबा राज्य सरकारकडे आला आहे. माझे सहकारी आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी लंडनमध्ये हा ताबा स्वीकारला. काही तांत्रिक कारणांमुळे ती मध्यस्थामार्फत खरेदी करावी लागली होती. पण, आता ती त्या मध्यस्थामार्फत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करीत त्यांनी ताब्यात घेतली आहे. आता ही तलवार लवकरच महाराष्ट्रात येईल आणि त्याचा कायमस्वरुपी ताबा हा राज्य सरकारकडे असेल.
🚩आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव असलेली, नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ही लिलावात निघाली होती. ती राज्य सरकारने 29 एप्रिल रोजी खरेदी केल्यानंतर, आज त्याचा प्रत्यक्ष ताबा राज्य सरकारकडे आला आहे.
माझे सहकारी आणि… pic.twitter.com/gnE4SZORtX— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 11, 2025
छत्रपती शाहू महाराजांनी ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी राजे रघुजी भोसले यांना दिली होती. राजे रघुजी भोसले यांनी अनेक युद्धमोहीमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. 1817 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे. आता ही तलवार अधिकृतपणे राज्य सरकारच्या ताब्यात आल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. यासाठी परिश्रम करणाऱ्या मंत्री आशिष शेलार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !