टाटा कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि शेकापकडून उपोषण
कर्जत: कर्जत तालुक्यातील टाटा कंपनी परिसरात होत असलेल्या माती उत्खनन आणि सुरुंग स्फोट लक्षात घेता अनेक गावांचे स्थलांतरण करण्याची वेळ आली आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या बोअरवेल बंद होणे आणि अन्य मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्षाने उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. दरम्यान,तीन पक्षांचे आंदोलन सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
कर्जत तालुक्यातील टाटा पॉवर हाऊस येथे स्थानिक भूमिपुत्रांच्या अनेक मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हाप्रमुख नितीन सावंत,शेकापचे तालुका चिटणीस तानाजी मते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे यांनी सकाळी उपोषणाला सुरुवात केली.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तपकीरवाडी (धनगरवाडा) – तत्काळ पुनर्वसन करा,ब्लास्टिंगमुळे घरांना तडे व पाणी गायब झाले असून त्याबाबत ताबडतोब उपाय करा.तसेच एकाच परिसरात अनेक धरणे – संभाव्य भूकंपाचा धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यात क्रशर प्लांट मानववस्ती पासून दूर – अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा.दुषित पिण्याचे पाणी – स्वतंत्र फिल्टर प्लांट बसवा.झाडतोडीमुळे माकडांचा त्रास – नुकसान भरपाई द्या.स्थानिक भूमिपुत्रांना – हक्काचा रोजगार द्या. शेतजमिनीच्या नुकसानीस – योग्य भरपाई द्या. स्थानिक वाहनधारक व कॉन्ट्रॅक्टर्सना – प्रथम प्राधान्य देणे, २४ तास फिरता दवाखाना वअॅम्ब्युलन्स – तातडीने सुरू करणे, कायमस्वरूपी हॉस्पिटल – तत्काळ उभारणे,सीएसआर निधीतून – गावविकासाची कामे करा.सिमेंट काँक्रीट रस्ते – सर्व गावांसाठी करा आणि सौर दिवे – सार्वजनिक ठिकाणी लावा,स्मशानभूमी – बांधकाम पूर्ण करा,ग्रामपंचायत कार्यालय – नुतनीकरण करा.भिवपुरी ग्रामपंचायत – आदर्श गाव म्हणून विकसित करा.
शेती पाईपलाईन – आवश्यक ठिकाणी वाल्व्ह बसवा.गाव तलाव – सुशोभीकरण करा आणि दुषित पाणी – नदी व नाल्यात सोडू नका या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे.
उपोषण सुरू झाल्यानंतर कर्जत तालुक्याचे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाल,तालुक्याचे तहसीलदार डॉ धनंजय जाधव,टाटा अधिकारी टाटा कंपनीचे अधिकारी अभिजीत पाटील,सीबी सिंग, लेंडर,मुंबई ऑफिस वसंत पिंगळे,माटे हे या चर्चेसाठी उपस्थित होते.परंतु त्यांच्या चर्चेत काही समाधान न झाल्याने उपोषण पुन्हा सुरूच राहिले आहे.तर काल येथे काही कामांची भूमिपूजन झाले त्या ठिकाणची जमीन आदिवासींच्या पुनर्वसनासाठी एका सैनिकाच्या जागेमध्ये भूमिपूजन करून दिशाभूल करण्याचे काम स्थानिक आमदार हे करत आहेत.या ठिकाणी तीन राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.त्यात पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा तापकीर वाडी,कराळेवाडी,धनगर वाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






