शिवसेनेने ठाकरेंना डिवचले (फोटो -सोशल मीडिया)
शिवसेनेने उडाली ठाकरेंची खिल्ली
महापालिका निवडणुकीआधी रंगले राजकारण
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची झाली घोषणा
मुंबई: ‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ असे म्हणत शिवसेनेने व्यंगचित्राद्वारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. वरळीमध्ये आज आदित्य ठाकरेंच्या सभेत ‘करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ या नाऱ्याची घोषणा केली जाणार आहे. मात्र, शिवसेनेने त्यांच्या या घोषणेचा फज्जा उडवून सध्या चर्चेत असलेल्या ‘रेहमान डकैत’ या धुरंधर सिनेमामधील पात्राचा आधार घेत टीका केली आहे.
मुंबईसह राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच झाली असून राजकीय वातावरण तापण्यासही सुरुवात झाली आहे. यानिमित्तानेच, शिवसेनेनेही २५ वर्षे मुंबईवर सत्ता गाजवणाऱ्या उबाठा गटावर टीका करणारे व्यंगचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. वरळीमध्ये आज आदित्य ठाकरे ‘करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ अशी घोषणा सभेमध्ये देणार आहेत. मात्र, नेमका त्यांच्या याच घोषणेचा फज्जा शिवसेनेने व्यंंगचित्राद्वारे उडवला. त्यांनी यात धुरंधर सिनेमातील गाजत असलेल्या रेहमान डकैत या पात्राचा आधार घेत उद्धव ठाकरेंचे एक व्यंगचित्र काढले आहे.
करून दाखवलं म्हणता-म्हणता
खाऊन दाखवलंची आली पाळी,
रेहमान डकैतचं पोट फुगलं
मुंबईकर ठरले त्याचे बळी!#Shivsena #Maharashtra pic.twitter.com/Pa5hQeBTEd — Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) December 16, 2025
त्यात हे पात्र ‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ असं म्हणत असून, त्याला घाबरून संजय राऊत व आदित्य ठाकरे खाऊन नव्हे करून म्हणा असे सांगताना दिसत आहेत. गेल्या २५ वर्षांत उबाठा गटाने मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवली त्यात सव्वा लाख कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आज भाजपकडून झाला असतानाच हे व्यंगचित्र बाहेर आले आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर हे व्यंगचित्र व्हायरल झाले असून अनेक जण उबाठा गटावर टीका करताना दिसत आहेत.
निवडणूक जाहीर झाली पण ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी?
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत. खासदार संजय राऊत म्हणाले की, “अद्याप युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही, हा प्रश्न तुम्ही महायुतीला का विचारत नाही? महायुती नावचं जे त्रांगड आहे, एकत्र येणार एकत्र लढणार त्यांना प्रश्न विचारता का? ठाकरे बंधुंना हा प्रश्न का विचारता? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढत आहेत. महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शाहंच्या पायावर डोकं ठेवावं लागतं. आमच्याशी युती करा युती करा, बाबा लगीन, बाबा लगीन” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
Thackeray Brothers Alliance : निवडणूक जाहीर झाली पण ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
पुढे ते म्हणाले की, “सध्याच्या क्षणी उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे, नाशिक या प्रमुख सहा महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढत आहोत. इतर ठिकाणी दोन्ही पक्षांचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते निर्णय घेतील. पण ही लढाई 29 महापालिकांपेक्षा मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राची मुख्य लढाई मुंबईसाठी होती. मुंबई महाराष्ट्रात रहावी यासाठी होती. संयुक्त महाराष्ट्राचा लढा 1956 साली सुरु झाला. त्यासाठी 106 लोकांनी बलिदान दिलं. आम्ही मुंबई अमित शाहंच्या घशात जाऊ देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.






