मुंबई : शिवसेना बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी सह्याद्री अतिथीगृहात (Sahyadri Guesthouse) आपल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करुन राजशिष्टाचार कायदा मोडला आहे. त्यामुळे राजशिष्टाचार विभागाने (Etiquette Department) त्यांच्यावर कायदेशीर कारवाई (Legal Action) करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सह्याद्री अतिथीगृहाचा वापर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, राज्याने निमंत्रित केलेले पाहुणे आणि प्रशासकीय कामासाठी केला जातो; मात्र आमदार संतोष बांगर यांनी आपल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन केले. हे शक्तीप्रदर्शन करण्याचे व्यासपीठ नसताना तसा प्रकार जाणूनबुजून करण्यात आला ही चुकीची घटना आहे. आमदार संतोष बांगर यांनी कायद्याचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.