कल्याण रेल्वे स्थानकात मेल एक्सप्रेस गाडी पकडत असताना प्रवाशाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरटयाला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विशाल महेंद्र काकडे असे आहे. या छोट्याचे वय २४ वर्ष आहे आणि हा सराईत चोरटा आहे. त्याने हिसकावलेला मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
नाशिक येथील निफाड नजीकच्या उगावात राहणारे रफिक तांबोळी हे कामानिमित्त कल्याणला आले होते. ते पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी ३१ जानेवारी रोजी कल्याण रेल्वे स्थानकातून मेल एक्सप्रेस पकडण्याची तयारी केली. ते गाडी पकडण्याच्या तयारीत असताना चोरट्याने त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. यावेळी रफिक यांनीआरडाओरड केला. रेल्वे पाेलिसांनी चोरट्याला अटक केली. चोरट्याचे नाव विशाल महेंद्र काकडे असे आहे. तो छत्रपती शिवाजी चौकात फूटपाथवर राहणारा आहे. तो सराईत चोरटा आहे.