Mumbai Famous Ganpati Mandal: गणेशोत्सव आण मुंबई यांचं समीकरणच वेगळं आहे. देशाची आर्थिक राजधानी, पर्यटन स्थळ, मायानगरी या व्यक्तिरिक्त मुंबईची आणखी एक ओळख म्हणजे गणेश मंडळ. मुंबईकरांच्या पिढ्यान पिढ्या या गणेश मंडळाच्या सेवेत खर्ची झाल्या आहे. फक्त गणपतीची मुर्तीच नाही तर सामाजिक भान जपत ही गणेश मंडळ विविध कार्यक्रम देखील राबवतात. दीड ते पाच दिवसांच्या गणपती विसर्गनानंतर मुंबईच्या या गणेश मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेण्यास आणि देखावा पाहण्यास मुंबईकर मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यातील एक प्रसिद्ध मंडळ म्हणजे लालबागचा राजा.
Ganesh Chaturthi 2025 : रंगारी बदक सार्वजनिक गणपती मंडळ, लोकमान्य टिळकांच्या प्रचार-प्रसारचं प्रतिक
लालबागचा राजा
“ही शान कुणाची लालबागच्या राजाची”, नवसाला पावणारा आणि सर्वात उंच म्हणून या गणपतीची खासियत आहे. या लालबागच्या राजाला फक्त मुंबईतून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. सहसा गणपतीची मूर्ती म्हटलं की ती कारखान्यात साकारली जाते आणि नंतर तिची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते. मात्र लालबागचा गणपती हा असा आहे की, जिथे तो विराजमान होतो तिथेच त्याची मूर्ती साकारली जाते.
लालबागचं गणेश मंडळ अत्यंत जूनं आहे. मंडळाची स्थापना झाली तीच 1931 मध्ये. १९३० च्या दशकात लालबाग परिसरात मोठं मार्केट उभारण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं, पण ते पूर्ण झालं नाही. त्या भागातील कामगार आणि रहिवाशांनी एकत्र येऊन गणेशोत्सव मंडळ स्थापन केलं आणि १९३४ मध्ये पहिल्यांदा “लालबागचा राजा” बसवला.लोकांचा विश्वास होता की या राजाच्या आशीर्वादाने त्यांची मनोकामना पूर्ण होईल, म्हणून याला नवसाचा गणपती असंही म्हणतात.या मंडळाचा इतिहास जवळजवळ 90 वर्षांचा आहे.
1932 मध्ये लालबाग परिसरातील गिरणी कामगाराचं स्वत:ची बाजारपेठ होती. कालांकराने ही बाजारपेठ बंद झाली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना याचा खूप त्रास झाला. त्या वेळी या भागातील गिरणी कामगार व कोळी समाजातील नागरिकांनी एकत्र असा पण केला की, नवी बाजारपेठ मिळाली तर गणपती बसवायचा. आणि 1934 साली कोळी बांधव आणि गरणी कामगरांना हक्काची बाजारपेठ मिळाली. त्यानंतर नवसाला पावणारा गणपती म्हणून हा या नागरिकांनी एकत्र येत गणपती बाजारपेठेत विराजमान केला. अशा रितीने 1934 साली लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन झालं.
या मंडळाची पहिली मूर्ती केशवजी गायकवाड नावाच्या मूर्तिकाराने घडवली होती. त्या वेळी मूर्ती साधारण 3 फूट उंच होती.सुरुवातीला लालबाग व परळ परिसरापुरताच असलेला हा राजा हळूहळू मुंबईबाहेर देखील नावारुपाला येऊ लागला. 1950 च्य़ा जवळपास “लालबागचा राजा” हे नाव प्रत्येकासाठी प्रचलित झालं .हळूहळू मूर्तीची उंची वाढवली गेली आणि दरवर्षी 20-25 फूट भव्य मूर्ती साकारली जाऊ लागली.1980 च्या दशकात मनोकामना पूर्ण करणारा राजा म्हणून या गणपतीची कीर्ती महाराष्ट्रभर गाजली. नवसाला पावणाऱ्या या राजाच्या ख्याती सर्वदूर पसरली. दरवर्षी चरणस्पर्श, मुखदर्शन आणि नवसाची रांग वेगवेगळ्या असतात. आजंही भाविक मोठ्या श्रद्धेने या राजाच्या पायी डोकं टेकवतात.