सोलापुर : काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयात न बसता तळागाळातील जनतेत जाऊन मोदी सरकारच्या नऊ वर्षे आणि महाराष्ट्रातील खोके आणि ईडीच्या भीतीने आलेल्या शिंदे सरकारच्या निषि्क्रय कारभाराचा पोलखोल करा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जुबेर कुरेशी आणि सोलापूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते व शहर अध्यक्ष चेतन नरोटे, मान्यवर नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापुर येथे करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमास शहर अध्यक्ष चेतन नरोटे, संयोजक अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष जुबेर कुरेशी, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, मा.नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेक़री, तौफ़ीक़ हत्तूरे, विनोद भोसले, अय्यूबभाई कुरेशी, मकबूल मोहोळकर, जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण, शौक़त पठाण, शकील मौलवी, रुस्तुम कंपली, प्रवक्ते अशोक निंबर्गी, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, अँड मनीष गडदे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, याकूब मंगलगिरी, मुबीन सय्यद, अहमद रायली, मोमीन सय्यद, हेमाताई चिंचोळकर, जाबीर अल्लोळी सुभाष वाघमारे, नागनाथ शावने अादी मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉंग्रेसची विचारधारा कोणी संपवू शकणार नाही
आमदार शिंदे म्हणाल्या, गोरगरीबांचा वाली फक्त काँग्रेस पक्ष असून काँग्रेसची विचारधारा कोणीच संपवू शकणार नाही. मोदी आणि राज्यातील तिघाड़ी सरकार लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी भ्रष्टाचारी लोकांना गोळा करून सत्ता मिळविण्यात व्यस्त आहेत. लोक महागाई, बेरोजगारी, गॅस सिलेंडरचे दरवाढ, अन्नधान्य, भाजीपालाच्या दरवाढीने त्रस्त आहेत.
जनतेत जाऊन नागरिकांच्या अडचणी समजून घ्या
आमदार शिंदे म्हणाल्या, जनता आमच्यासाठी सर्वस्व असून राहुल गांधी ज्याप्रमाणे भारत जोडोच्या माध्यमातून जनतेत जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्याचप्रमाणे लोकांच्या हितासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करावे. काँग्रेस पक्षासाठी आशादायक वातावरण असून अनेक जण काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक आहेत असे म्हणाले. तसेच चेतन नरोटे, जुबेर कुरेशी, प्रमिला तुपलवंडे, यांनाही त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.