बीड : बीडच्या परळी मध्ये आय. पी. एस पंकज कुमावत यांच्या विशेष पथकाने छापा टाकून अवैध विक्री होणारा गुटखा पकडला आहे. यातील चार आरोपींपैकी एक आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.
दरम्यान टाकण्यात आलेल्या छाप्यात पोलिसांनी दोन लाख 11 हजरांचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्यात गुटखा विक्री असताना देखील सर्रास विक्री आजही सुरू आहे. आणि याचीच माहिती पोलिसांना मिळताच या विशेष पथकाने परळीत येऊन छापा टाकला आहे.
[read_also content=”शेतकरी रहायला नांदेडला आणि शेती तेलंगणात, काय आहे बातमी? : जाणून घ्या सविस्तर https://www.navarashtra.com/maharashtra/farmers-live-in-nanded-and-agriculture-in-telangana-whats-the-news-learn-more-nrdm-260316.html”]
वैभव बुरांडे, राधेश्याम लाहोटी, फिरोज पठाण आणि रौफ लाला या आरोपींचा समावेश आहे. मागील काही दिवसांमध्ये गुटखा माफियांवर कुमावत यांच्या विशेष पथकाकडून कारवाई केली जात असल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.