'देवेंद्र फडणवीस रोमँटिक आहेत का?' या प्रश्नावर अमृता फडणवीस काय म्हणाल्या? (फोटो सौजन्य-X )
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या प्रचंड चर्चेत आहेत. याचं महत्त्वाचे कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने होत असलेली टीका. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो, राजकोटमधील शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा असो, बदलापूरचा मुद्दा असो, देवेंद्र फडणवीसांचे विरोधक लगेच तुटून पडतात. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एका वाहिनीला मुलाखत दिली त्यातही सगळे त्यांचा अभिमन्यू करु पाहात आहेत पण मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदायचा कसा ते ठाऊक आहे आणि बाहेर कसं यायचं ते पण माहीत आहे असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.
एकीकडे देवेंद्र फडणवीस जसे चर्चेत असतात त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ही चर्चेच असतात. अमृता फडणवीस यांनी नुकतीच सन मराठी या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली, या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस हे रोमँटिक नाहीत, असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यांमुळेच कायमच चर्चेचा विषय ठरतात. आता अमृता फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच गाजत आहे.
“धरण उशाला कोरड घशाला असं म्हटलं जातं तेव्हा देवेंद्र फडणवीस माझ्यासमोर येतात, जातात. दिसतात रोज पण त्यांचा हात धरुन मजा मस्ती करताच येत नाही. धरण उशाला असतं आणि कोरड घशाला.” असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यावर सोनाली कुलकर्णीने प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीस रोमँटिक आहेत का? यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, “नाही, देवेंद्र फडणवीस कधीच रोमँटिक नव्हते. . लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही, देवेंद्रजी प्रॅक्टीकल आहेत मी रोमँटिक आहेत, त्यांना रोमान्स कळतही नाही आणि जमतही नाही. त्यांना फक्त राजकारण कळतं.” अमृता फडणवीस यांचे हे विधान चर्चेत आहे.
वाहिनीवर मुलाखत देताना अमृता फडणवीस यांना धनुष्यबाण की घड्याळ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला दोन्ही आपल्याकडे असल्याचे हसत उत्तर दिले. तसेच मी फिरते तळ्यात नजर माझी मळ्यात देवेंद्र सारखे रत्न पडले माझ्या गळ्यात, असा उखाणा देखील अमृता फडणवीसांनी घेतला.