Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवेंद्र फडणवीसांचं भाजपातलं महत्त्व वाढतंय का? लवकरच फडणवीस राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार? नेमक काय घडलं…

भाजपकडे नेत्यांची आणि प्रवक्ते यांची मोठी फळी असतानाही फडणवीस हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठळक नजरेत आले, उठून दिसले. यामुळं देवेंद्र फडणवीसांचं भाजपातलं महत्त्व वाढतंय का?...

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 18, 2023 | 08:50 AM
देवेंद्र फडणवीसांचं भाजपातलं महत्त्व वाढतंय का? लवकरच फडणवीस राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार? नेमक काय घडलं…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई- नवी दिल्लीत (Delhi) भाजपाची (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल संपन्न झाली. यावेळी अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली तसेच देशातील आगामी नऊ राज्यातील विधानसभा निवडणुका यावर देखील रणनीती ठरवण्यात आली. दरम्यान, या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले भाषण, कार्यकारिणीत मांडलेले दोन ठराव यांची जोरदार चर्चा सुरु आहे.

[read_also content=”मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबईत भाजपा-शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शन, ठाकरेंच्या अंगणात पोस्टरबाजी; उदया मुंबई महापालिकेच्या प्रचाराचं बिगुल वाजणार? https://www.navarashtra.com/maharashtra/on-the-occasion-of-modi-visit-the-bjp-shinde-faction-in-mumbai-showed-power-displayed-posters-in-thackeray-yard-will-sound-the-trumpet-of-the-campaign-of-mumbai-municipal-corporation-362566.html”]

फडणवीसांचं भाजपातलं महत्त्व वाढतंय?

देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दोन ठराव मांडले. तसेच पंतप्रधानांच्या भाषणातले मुद्दे सांगण्यासाठी पक्षाने त्यांना पत्रकार परिषद घेण्याची संधी दिली. भाजपकडे नेत्यांची आणि प्रवक्ते यांची मोठी फळी असतानाही फडणवीस हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठळक नजरेत आले, उठून दिसले. यामुळं देवेंद्र फडणवीसांचं भाजपातलं महत्त्व वाढतंय का? परिणामी लवकरच देशपातळीवर किंवा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

ठराव आणि फडणवीस काय म्हणाले?

‘बेटी बचाओ- बेटी पढ़ाओ’च्या धर्तीवर ‘धरती बचाओ’ अभियान राबवले पाहिजे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले, की पंतप्रधांनांनी सांगितले आहे, सीमेलगतची गावे आणि जिल्ह्यांत पक्षाने एक असा उपक्रम राबवला पाहिजे, ज्यामुळे तेथे विकास होईल आणि लोकांचे जीवनमान उंचावेल. ज्याप्रमाणे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबवण्यात आले त्याच धर्तीवर ‘धरती बचाओ’ अभियान राबवायला हवे. नैसर्गिक शेती असो की मग सौरऊर्जा किंवा अन्य एखादा उपक्रम. आज पृथ्वीला वाचवण्याची गरज आहे. तसेच सामाजिक आणि आर्थिक संकल्प हे दोन ठराव कार्यकारिणीत फडणवीसांनी मांडले आणि ते पारित झाले.

दूरदृष्टीने काम करा- पंतप्रधान

दरम्यान, पंतप्रधानांनी भाजपसाठी पुढील २५ वर्षांचे व्हिजनही मांडले. यात पक्षाला फक्त राजकीय न ठेवता सामाजिक उपक्रमाच्या रूपात बदलण्याचे आवाहन करण्यात आले. एक पक्ष म्हणून भाजपने जो पल्ला गाठला आहे, त्याची व्याप्ती वाढवून सामाजिक कामे करण्यापर्यंत न्यायचे आहे. मोदी म्हणाले, की नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बूथ मजबूत करा १८ तेे २५ वयाच्या तरुणामध्ये सुशासन काय असते, हे स्पष्ट करा. बैठकीच्या शेवटच्या दिवशी पक्षाने एक महत्वाचा निर्णय घेेत अध्यक्ष जे. पी. नड्‌डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवला आहे.

Web Title: Is the importance of devendra fadnavis increasing in bjp will fadnavis be active in national politics soon what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2023 | 08:50 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Ashish Shelar
  • bachu kadu
  • Cm Eknath Shinde
  • DCM Devendra Fadanvis
  • Hasan Mushrif
  • jayant patil
  • Prakash Ambedkar
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray
  • जयंत पाटील Bhagat singh Koshyari

संबंधित बातम्या

“केवळ माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला असं म्हणून चालत नाही,” सभागृहातील उपस्थितीवरून भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
1

“केवळ माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला असं म्हणून चालत नाही,” सभागृहातील उपस्थितीवरून भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sanjay Raut PC: ‘अजित पवारांचा पक्ष मुळात कधी अस्तित्वातच नव्हता; संजय राऊतांचे महायुतीवर टीकास्त्र
2

Sanjay Raut PC: ‘अजित पवारांचा पक्ष मुळात कधी अस्तित्वातच नव्हता; संजय राऊतांचे महायुतीवर टीकास्त्र

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
3

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
4

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.