बालसुधार गृह जळगाव : जळगाव (Jalgoan) येथील मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नुकतीच एक बातमी जळगाव शहरातून आली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी अल्पवयीन मुलगी ही मागील काही दिवसांपासून जळगाव येथील बालसुधार गृह (Child Reform Home) जिल्हा परिविक्षा निरीक्षण गृहात होती. तीला घरी जायचे होते. परंतू तिचे वडील बाहेरगावी असल्याने तिला नेणे शक्य झाले नाही. त्यामुळे तिने बालसुधार गृहातील शौचालयात १४ वर्षीय बालिकेने १२ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचारास सुरू असतांना आज तिचा मृ-त्यू झाला आहे.
या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरी जाण्याच्या मागणीच्या दुसऱ्याच दिवशी तिने गळफास घेतला. तिच्यावर ११ दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर आज तिची प्राणज्योत मावळली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जळगावचे पोलीस निरीक्षक आणि जिल्हापेठ पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल (Dr. Vishal Jaiswal) यांनी या बाबतीत माहिती दिली आहे.
जळगाव येथील या मुलीने आधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे तीन बालसुधार गृहामध्ये ठेवण्यात आले होते. बालसुधार गृहामध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. या मुलीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अजून पर्यत या घटनेच्या संदर्भात कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ही मुलगी फक्त १४ वर्षाची होती आणि या मुलीने १४ ऑगस्ट रोजी मुलीचे निरीक्षण व शिशुगृह येथे गळफास घेतला आहे. ही मुलगी जळगाव जिल्यामधील अमळनेर येथे राहणारी होती. पोलिसांनी या मुलीच्या मृत्यूची नोंद केली आहे.