जालना : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंध (Corona Restriction In Maharashtra) वाढविण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा विचार आहे. त्यामुळे राज्यात मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाचा अंत (Corona Will End In March) होईल, असे विधान टोपे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ते जालन्यात बोलत होते.
[read_also content=”सलग दुसऱ्या वर्षी उत्तर प्रदेशचा चित्ररथ ठरला सर्वोत्कृष्ट, महाराष्ट्राच्या जैवविविधतादर्शन चित्ररथाने पॉप्युलर चॉईस गटात मारली बाजी https://www.navarashtra.com/india/uttar-pradesh-tableau-selected-as-best-tableau-of-rd-parade-2022-maharashtra-tableau-got-first-rank-in-popular-choice-category-nrsr-232579.html”]
निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे शासनाचा कल
राज्यात पहिल्या डोसचे ९२ टक्के लसीकरण झाले असून ५५ ते ६० टक्के दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. टोपे म्हणाले की, राजातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून, मुंबई-पुण्यातही रूग्णसंख्या कमी होत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी, ती पुन्हा खाली येईल. त्यामुळे आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे. सध्या राज्यात राज्य शासनाकडून लावण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी होतील, असेही टोपे म्हणाले.