सौजन्य - नवराष्ट्र टीम
जत : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने २४ तासांत वयोवृद्ध महिलेला लुटणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. आरोपीने चोरलेला १ लाख ३५ लख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीचे नाव महादेव मारुती ठवरे (वय ४०, घाटगेवाडी रोड, रामपूर ता. जत) असे आहे.
दिनांक २४ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास लोखंडी पूल वाचनालय चौक येथून वत्सला कल्लाप्पा चमकेरी (वय ७०, रा. चमकेरी मळा, जत) यांना महादेव मारुती ठवरे या व्यक्तीने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले. येळदरी गावाच्या हद्दीत नेऊन आरोपीने त्यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील ७०,००० रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ व २५,००० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितु खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, उपनिरीक्षक जीवन कांबळे व त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तपासादरम्यान महादेव ठवरेने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे पुढील तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : सोशल मिडीया वापरताना लक्ष्मण रेषा आखून घ्या; पोलीस आयुक्तांचे तरूण- तरूणींना अवाहन
गोपनीय माहितीच्या आधारे तपास
दिनांक २५ जानेवारी रोजी सायंकाळी तीनच्या सुमारास वत्सला चमकेरी यांच्या तक्रारीवरून जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे महादेव मारुती ठवरे (वय ४०, रा. रामपूर घाटगेवाडी रोड) याला अटक करण्यात आली.
कारची काच फोडून चोरी
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातील विमाननगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली असून, या चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहा व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून विमाननगर येथे आले होते. तेव्हा विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री कार लावली. नंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी चोरट्यांनी कारची काच फोडली. कारमधील पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन पोबारा केला. घटना लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.