मुंबई – बॉलिबूडचा महानायक ‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे माजी सुरक्षारक्षक जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) यांना मुंबई पोलीस दलातून बुधवारी (21 डिसेंबर) ‘सक्तीने सेवानिवृत्त’ करण्यात आले आहे. जितेंद्र शिंदे यांच्या विभागीय चौकशीमध्ये त्यांनी पोलीस सेवा नियमांच उल्लंघन केल्याचा समोर आले आहे. जितेंद्र शिंदे हे वर्ष 2015 पासून बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चनच्या सुरक्षेत होते. पण 2021 मध्ये पोलीस सेवेच्या नियमांचा उल्लंघन केल्या प्रकरणी जितेंद्र शिंदे यांची बदली करण्यात आली होती. मात्र 2021 मध्ये पोलीस सेवेच्या नियमांचा उल्लंघन केल्या प्रकरणी शिंदे यांची बदली करण्यात आली होती.
[read_also content=”कर्नाटक व शिंदे सरकारच्या विरोधात मविआ आमदार आक्रमक; काळ्या पट्टया बांधत आमदारांचे विधानभवनाच्या पायर्यांवर निषेध आंदोलन आणि जोरदार घोषणाबाजी… https://www.navarashtra.com/maharashtra/mva-mla-aggressive-against-karnataka-and-shinde-government-by-tying-black-belts-the-mla-protested-on-the-steps-of-the-vidhan-bhavan-and-raised-loud-slogans-355926.html”]
दरम्यान, शिंदे यांची विभागीय चौकशीमध्ये त्यांनी पोलीस सेवा नियमांच उल्लंघन केल्याचा समोर आलाय, जितेंद्र शिंदे यांनी सरकारी नियमांचे उल्लंघन करून पत्नीच्या नावे खासगी सुरक्षा एजन्सी स्थापन केली होती. वर्षाला दीड कोटी एवढे त्यांनी कमावले होते. शिंदे हे 6 वेळा परदेशात गेले त्यात सिंगापूर, सौदी अरबिया आणि इतर देशाचा समावेश आहे. त्यांनी कोट्यवधींची संपत्ती खरेदी केल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र शिंदे यांनी वरील सर्व माहिती पोलीस खात्यातून लपविलयाचा तपासात समोर आलेय. शिंदे यांनी वरील माहिती लपवून पोलीस सेवा नियमांचा उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
वर्षाला करोडोची कमाई आणि परदेशवारी
शिंदेंनी माहिती लपवून पोलीस सेवा नियमांचा उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या संदर्भात शिंदे यांना या महिन्याच्या सुरुवातीला कारणे दाखवा नोटीस दिली गेली होती, मात्र उत्तर असमाधानकारक होते. म्हणून शिंदे यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची पोलीस विभागाने माहिती दिली आहे. जितेंद्र शिंदे यांचा पगार हा एखाद्या बड्या कंपनीच्या सीईओपेक्षाही अधिक आहे. त्यांच्या वेतनाचा आकडा थक्क करणारा आहे. जितेंद्र शिंदे हे 6 वेळा परदेशात गेले त्यात सिंगापूर, सौदी अरेबिया आणि इतर देशाचा समावेश आहे. पत्नीच्या नावे खासगी सुरक्षा एजन्सी स्थापन केली होती. शिंदे हे वर्षाला दीड कोटींची करत होते.