कल्याण : आरक्षित भूखंडावर स्थानिक नगरसेवकांच्या आशिर्वादाने बेकायदा बांधकामे झाली. तेव्हा काही कारवाई केली गेली नाही. आता भूमिपुत्रांच्या मेाकळ्या जागेवर आरक्षण टाकले जात आहे. ही काही मोगलाई नाही. कुणीपण येईल आणि आम्हाला पैसे देईल आणि जागा घेणार. भूमीपूत्रांच्या जमीनीवर कचऱ्याचे प्रकल्प आणले जात आहेत. २७ गावावर अनेक आरक्षणे ओतून ठेवली आहेत अशा वेळी आम्ही काय करणार. आमच्याकडे एकच हत्यार आहे कोयता. तो काढा बोललो. असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी आगासन येथे भूमीपूत्रांच्या बैठकीत केले आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीतील आगासन परिसरातील ३५ एकर जागेवर प्रशासनाकडून आरक्षण टाकण्यात आले आहे. पोलीस स्टेशन, पार्कींग बाजार आदी आरक्षणे टाकली गेली आहे. काही दिवसापूर्वी सर्वे झाला. सर्वेनंतर स्थानिक भूमीपूत्र प्रचंड नाराज झाले आहे. आगासन येथील मंदीरात शेतकरी भूमीपूत्रांची आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचे राेहिदास मुंडे, मनसे आमदार राजू पाटील, मनसे शहर प्रमुख तुषार पाटील हे उपस्थित होते.
या बैठकीत भूमीपूत्रांनी त्यांची व्यथा मांडली. या वेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी आश्वासन दिले की, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. या भागात अनेक आरक्षित भूखंडावर स्थानिक नगरसेवकाच्या आशीर्वादाने बेकायदा बांधकामे झाली. तेव्हा त्यांना कोणी थांबविले नाही. आत्ता भूमीपूत्रांच्या खाजगी आणि मोकळ्या जागेवर आरक्षण टाकले जात आहे. या ठिकाणी मोगलाईन सुरु नाही आहे. कोणीपण येईल. पैसे देईल आणि आमची जागा घेणार. काही ठिकाणी कचऱ्याचे प्रकल्प आणले जात आहेत. काही ठिकाणी आरक्षणे टाकली जात आहेत. तिथे कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावात आरक्षणे ओतून ठेवली आहेत. तर आमचे लोक काय करणार. आमच्याकडे एकच हत्यार आहे कोयता. असे राजू पाटील यांनी विधान केले आहे.
या बाबत स्थानिक नागरीक उदय मुंडे यांनी सांगितले की, स्थानिक शेतकऱ्यांची जागा आहे. आमची तिसरी पिढी या ठिकाणी शेती करीत आहे. पूर्वी प्रशासनाने भूसंपादन केले नाही. त्याठिकाणी लक्ष न देता बेकायदा बांधकामे झाली. आता जी सरकारी जमीन आहे त्याठिकाणी पैसे ही द्यावे लागणार नाही. त्या जागा ही ते ताब्यात घेत नाही. तिथे तर त्यांना पैसे पण द्यावे लागणार नाहीत. असे न करता आमच्या जागेवर आरक्षण टाकतात. खाजगी जमीनीवर आरक्षणे टाकल्याने आम्ही भूमीहीन होत आहोत. ही सर्व जी तयार होणार आहेत. ती दिवा रेल्वे स्थानकात हवीत. तर लोकांना फायदा झाला असता. आगासन हे ठाणे महापलिकेतील शेवटचे गाव आहे. स्थानिक बिल्डरांचे साटे लोटे आहे.