कर्जत बाजारपेठेतील वीज समस्या सोडवण्यासाठी ६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर
आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत बाजारपेठेसाठी ६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून देण्यात आला आला.या नवीन वीज उपकरणाचा लोकार्पण सोहळा शनी मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, माजी उप नगराध्यक्ष अशोक ओसवाल, पालिकेचे विरोधी पक्षनेते ॲड. संकेत भासे, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे,संजय मोहिते, माजी शहर प्रमुख मोहन ओसवाल यांच्यासह नगरसेवक नगरसेविका यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी कर्जत शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
गेल्या अनेक महिन्यापासून बाजारपेठेतील व्यापारी विजेच्या समस्येमुळे त्रस्त होते. विशेषतः सणासुदीच्या काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याचा परिणाम त्यांच्या व्यापारावर होत असल्याने व्यापाऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन कर्जत नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक अॅड. रोहित ओसवाल यांनी पुढाकार घेतला.
बाजारपेठेतील विजेची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा, अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे सातत्याने लावून धरली होती. अखेर या मागणीला यश आले असून या लोकार्पण सोहळ्यामुळे बाजारपेठेतील वीजपुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. अशी अपेक्षा व्यापारी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेषतः सणासुदीच्या काळात होणारा वीजपुरवठ्याचा लपंडाव थांबून व्यापाराला दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. एकंदरीत, कर्जत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सातत्याने मांडलेला विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले असून, नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे व्यापाऱ्यांना कितपत दिलासा मिळाला असल्याचे व्यापारी बोलून दाखवत होते.
Ans: ६३० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला.
Ans: आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.
Ans: वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.






