Raigad News: आचार्य महाविद्यालयाची मुजोरी; CET परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे
कर्जत/संतोष पेरणे: कर्जत तालुक्यातील शेलू येथे असलेल्या आचार्य इन्स्टिटयूट हे CET साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एंट्रन्स परीक्षेचे केंद्र असते. यावर्षी विधी शाखेसाठी असलेली परीक्षा आज म्हणजेच 28 एप्रिल रोजी होती आणि या परीक्षेसाठी असलेल्या शेलू येथील आचार्य महाविद्यालय येथील केंद्रावर येणाऱ्या परीक्षार्थी यांच्याकडून त्यांनी सोबत आणलेल्या वाहनांसाठी पार्किंग रक्कम घेतले जात होते.
परीक्षार्थी विद्यार्थी यांनी परीक्षेचे केंद्र असलेल्या महाविद्यालयासाठी ठराविक रक्कम राज्य सरकारच्या तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडून ऑनलाईन स्वरूपात भरली होती. त्यामुळे आचार्य कॉलेज प्रशासनाला कोणत्याही प्रकारची अतिरिक्त फी वसूल करण्याचे अधिकार नसताना देखील पार्किंग फी वसूल केली. तसेच महाविद्यालयात परीक्षार्थी यांच्यासाठी पाण्याची सुविधा नव्हती व स्वच्छतागृह देखील उपलब्ध नव्हते त्यामुळे या महाविद्यालयाची शासनाने चौकशी करावी अशी मागणी विद्यार्थी वर्गातून केली जात आहे.
महत्वाची बातमी! पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
सीईटी परिषदेचे केंद्र असलेल्या शेलू येथील आचार्य कॉलेज हे कॉलेजमध्ये परीक्षेसाठी चार चाकी व दुचाकी घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून चक्क पार्किंगचे पैसे आकारले जात होते. दुचाकीसाठी वीस रुपये व चार चाकी साठी पन्नास रुपये असा दर आकारत असून पार्किंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट कॉलेज प्रशासन करत आहे.
मुंबई पासून रायगड ठाणे जिल्ह्यातील परीक्षार्थी हे सीईटी परीक्षा देण्यासाठी शेलू येथील केंद्रावर येत असतात. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची सुख सुविधा कॉलेज कडून पुरवण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची अथवा बाथरूमची सोय कोणत्याही प्रकारची योग्य सोय उपलब्ध झाली नसल्याचे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. तसेच पार्किंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे लाटण्याचा आचार्य कॉलेज करत असल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस झाला आहे.
Pahalgam Terror Attack: “विजय वडेट्टीवार यांनी निर्लज्जपणाचे…”; शिवसेनेचे मुंबईत जोरदार आंदोलन
CET साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शासनाकडून अशा मोजक्याच कॉलेजचे निवड करण्यात येत असते व त्यासाठी कॉलेजला त्याचा योग्य तो मोबदला शासनाकडून दिला जात असतो. शासन यासाठी विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरताना शुल्क आकारत असतो. तरी देखील आचार्य कॉलेज हे विद्यार्थ्यांकडून पार्किंगच्या नावाने लूटमार करत आहेत.
कॉलेज प्रशासनाला CET परीक्षेसाठी सरकारकडून मोबदला देण्यात आलेला असून येणाऱ्या विद्यार्थ्याला योग्य ते सहकार्य देणे हे कॉलेज प्रशासनाचे कर्तव्य असून कॉलेजच्या मोकळ्या जागेचा वापर हा पार्किंगसाठी असून देखील गेटच्या बाहेर टेबल लावून बसलेल्या कोणत्याही प्रकारचे आयडी न घातलेल्या लोकांकडून ही वसुली कॉलेज करत आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे कोणते पैसे आकारले जात आहे असे विचारले असता हे कॉलेजच्या आवारात गाडी लावण्याचे पैसे आहेत. पैसे दिले तरच तुम्हाला गाडी आत मध्ये नेता येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.