Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC Hospital News: रुक्मिणीबाई रुग्णालयात धक्कादायक निष्काळजीपणा; लहान मुलाच्या कमरेत अडकली इंजेक्शनची सुई

KDMC Hospital News:  कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात एका लहान मुलाच्या कमरेत इंजेक्शनची सुई अडकल्याच्या घटनेची चौकशी सुरू आहे. इंजेक्शन शिकाऊ डॉक्टरने दिल्याचा दावा असून, त्यावेळी वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन सदस्यीय समितीमार्फत तपास सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 05, 2026 | 03:17 PM
रुक्मिणीबाई रुग्णालयात धक्कादायक निष्काळजीपणा; लहान मुलाच्या कमरेत अडकली इंजेक्शनची सुई

रुक्मिणीबाई रुग्णालयात धक्कादायक निष्काळजीपणा; लहान मुलाच्या कमरेत अडकली इंजेक्शनची सुई

Follow Us
Follow Us:
  • शिकाऊ डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शननंतर मुलाच्या कमरेत अडकली सुई
  • वरिष्ठ डॉक्टर गैरहजर असल्याचा आरोप
  • केडीएमसी रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रकाराची चौकशी
KDMC Hospital News Marathi: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी)च्या रुक्मिणीबाई रुग्णालयात एका लहान मुलाच्या कमरेत इंजेक्शनची सुई अडकल्याच्या धक्कादायक समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवांबाबत तसेच रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

स्वतंत्र चौकशी सुरू

या घटनेची दखल घेत अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. संतोष वर्मा आणि केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असून, संपूर्ण घटनेचा अहवाल मागविण्यात आला आहे.

या घटनेनंतर मुलाची आई काजल पांडे यांनी इंजेक्शन देताना सुई तुटल्याचा संशय व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र, “सुई कदाचित खाली पडली असेल”, असे सांगत डॉक्टरांनी त्यांना मुलाला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे. दरम्यान, आपल्या मुलासोबत घडलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून असा प्रसंग इतर कोणत्याही निष्पाप बालकावर ओढवू नये, अशी भावनिक प्रतिक्रिया मुलाचे आई-वडील यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

KDMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत सत्तावाटप निश्चित! महापौरपद शिंदे सेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपला; मनसेचा मोठा पाठिंबा

मात्र, घरी गेल्यानंतर काही वेळातच मुलाला कमरेच्या भागात तीव्र वेदना सुरू झाल्या. मुलगा सतत रडू लागल्याने आणि त्याचा त्रास वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी पुन्हा वैद्यकीय मदत घेतली. त्यानंतर मुलाच्या शरीरात इंजेक्शनची सुई अडकल्याचा प्रकार समोर आल्याने या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले.

इंजेक्शन शिकाऊ डॉक्टरने दिले

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मुलाला इंजेक्शन अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका शिकाऊ डॉक्टरने दिले होते. मात्र, वैद्यकीय नियमांनुसार शिकाऊ डॉक्टर उपचार करताना वरिष्ठ डॉक्टरांची उपस्थिती आवश्यक असते. या प्रकरणात इंजेक्शन देताना केडीएमसी रुग्णालयातील संबंधित वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या घटनेमुळे शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार करताना आवश्यक देखरेख ठेवली जाते का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच रुग्णालयातील प्रशासकीय त्रुटी, डॉक्टरांमधील समन्वयाचा अभाव किंवा अंतर्गत वाद यांचा फटका रुग्णांना बसत असल्याची टीकाही व्यक्त होत आहे.

अहवालात निष्काळजीपणा

दरम्यान, चौकशी समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर नेमकी जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. अहवालात निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर प्रशासकीय अथवा शिस्तभंगाची कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील उपचार पद्धती आणि शिकाऊ डॉक्टरांच्या देखरेखीबाबतचे नियम अधिक कडक करण्याची मागणीही पुढे येत आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी अमित कोलेकर यांनीही जबाबदार अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, रुग्णालयातील हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे निष्पाप रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.

सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, चौकशी अहवालानंतर नेमकी जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. मात्र, या घटनेबाबत रुक्मिणीबाई रुग्णालय प्रशासन किंवा केडीएमसीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे चौकशी अहवालात कोणते निष्कर्ष समोर येतात आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”

Web Title: Kdmc rukminibai hospital child needle stuck trainee doctor probe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Dombivli
  • Hospital
  • kalyan
  • KDMC

संबंधित बातम्या

KDMC News: ‘आयुक्त म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर’; केडीएमसी आयुक्तांच्या उपस्थितीवर काँग्रेसचा हल्लाबोल
1

KDMC News: ‘आयुक्त म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर’; केडीएमसी आयुक्तांच्या उपस्थितीवर काँग्रेसचा हल्लाबोल

Kalyan News: जन्मदात्या बापानेच केलं पोटच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; १४ वर्षानंतर मिळाला न्याय
2

Kalyan News: जन्मदात्या बापानेच केलं पोटच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; १४ वर्षानंतर मिळाला न्याय

ठाकरेंना आणखी एक धक्का! कल्याणच्या बड्या महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा; नव्या राजकीय चर्चांना उधाण
3

ठाकरेंना आणखी एक धक्का! कल्याणच्या बड्या महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा; नव्या राजकीय चर्चांना उधाण

प्रवाशांना मोठा दिलासा! कल्याण–मुरबाड मार्गावर एसटीच्या ४८ वरून १०८ फेऱ्या,  सरनाईकांच्या ‘या’ निर्णयामुळे प्रवासीसंख्या दुप्पट
4

प्रवाशांना मोठा दिलासा! कल्याण–मुरबाड मार्गावर एसटीच्या ४८ वरून १०८ फेऱ्या,  सरनाईकांच्या ‘या’ निर्णयामुळे प्रवासीसंख्या दुप्पट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.