राजगुरूनगर : जाणीव जागृती मंच अंतर्गत क्रांतिसिंह राजगुरू बुद्धिबळ ( चेस ) अकॅडमीच्यावतीने प्रथमच शहरात आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात उमेश तर १७ वर्षांखालील गटात सोहम गोरडे, १४ वर्षांखालील गटात प्रथम वाळुंज, ११ वर्षांखालील गटात ध्रुव वाकचौरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण ६६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन राजगुरुनगरमधील सोने चांदी विक्रीचे प्रसिद्ध व्यापारी प्रथमेश जवळेकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना त्यांच्या सराफ पेढीतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतमाता प्रमोद सुधाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष बोथरा उपस्थित होते.
-स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
खुल्या गटात उमेश खेंगरे यांनी प्रथम क्रमांक, श्रीकांत मुनचंडीकर यांनी द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आकाश तालिकोटे बक्षीस मिळवले आहे. सदर बक्षीसास राजगुरुनगर मधील स्टील आणि सिमेंट सप्लायरचे प्रसिद्ध उद्योजक श्री विपुल कर्नावट, प्रोप्रा हॅप्पी हाऊस राजगुरुनगर यांनी पारितोषिक वितरण केले. तर अंडर १७ मधील प्रथम विजेत्ता सोहम गोरडे, द्वितीय क्रमांक यश थिगळे, तृतीय क्रमांक मदुसिम मोमीन, अंडर १४ मध्ये प्रथम निपुण वाळुंज, द्वितीय क्रमांक आयन शेख, तृतीय क्रमांक तन्मय कांकरिया, तसेच अंडर ११ गटामध्ये प्रथम क्रमांक ध्रुव वाकचौरे, द्वितीय स्नेहल तांबे, आणि तृतीय क्रमांक मीहीका येवरे.
-स्पर्धेसाठी यांचे परिश्रम
या सर्व विजेत्या स्पर्धकांना राजगुरुनगरमधील ज्योती आवाज नागरी पतसंस्था यांनी रौप्य महोत्सवानिमित्त अध्यक्ष प्रा. विष्णू लडकत यांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आली. स्पर्धेस प्रथम तीन क्रमांकास ट्रॉफी व चेस बोर्ड देण्यात आले. तसेच महिला विशेष पुरस्कार शुभश्री राऊत हीस मिळाला. प्रास्ताविक विठ्ठल भोर यांनी केले. सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संयोजक सुनील मांजरे, राष्ट्रपती पारितोषिक विजेते विठ्ठल भोर, मंचचे उपाध्यक्ष विठ्ठल मांजरे, क्रांतिसिंह राजगुरू बुद्धिबळ अकॅडमीचे सदस्य विष्णू मेदगे, गजानन मायदेव, पांडुरंग पवळे, चिन्मय जगताप यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले. आरबिटर म्हणून नवी सांगवी येथील मिलिंद नाईक यांनी मदत केली.
-यांची उपस्थित आणि सहभाग
जाणीव जागृती मंचचे अध्यक्ष विठ्ठल भोर, मुरलीधर थिगळे, महादेव घुले, गोपाळ थिगळे, ग्रामसेविका झरेकर, महावितरणाचे कनिष्ठ अभियंता बाळासाहेब सोनवणे, प्रसिद्ध व्यापारी राजेश धोका उपस्थित होते. स्पर्धकांमध्ये पत्रकार शिवराज कपाले, डॉ. अभिनव गोडसे, रुपेश पाटोळे लक्ष्मीकांत देशमुख, अश्विनी घाडगे, अभिजीत होनराव, विष्णू मेदगे, गजानन मायदेव, विक्रांत ओव्हाळ, संकेत लोहार, ओंकार माळी, गणेश फलके, हर्षवर्धन कवठेकर, अमृता मायदेव, ध्रुव वाकचौरे, श्लोक गायकवाड, गौरव टाकळकर, स्पंदन कडलक, सुप्रीता पाटोळे, सार्थक तांबे आदींनी सहभाग घेतला.