खासदार धनंजय महाडीक (फोटो- ट्विटर)
“कोल्हापूरच्या राजघराण्यातील सदस्य मधुरिमाराजे छत्रपती यांचं उमेदवारी जाहीर झालेलं पत्र आले. वाजत गाजत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीची पहिली पसंती राजू लाटकर ना होती आणि दुसरी पसंती मधुरिमाराजे छत्रपतींना होती. हा तर छत्रपती घराण्याचा अवमान आहे. लाटकर यांची उमेदवारी मागे घेण्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. खासदार शाहू महाराज, मधुरिमाराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांनी जाऊन उमेदवारी मागे घेतली. हे काँग्रेसच्या संपूर्ण इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल. उमेदवारी मागं घेऊन कार्यालयातून बाहेर येत असतानाचे व्हिडिओ हे मन हेलावून टाकणारे होते. सतेज पाटील यांच्या स्वभावामुळं ही परिस्थिती आली. मी म्हणेण तोच कायदा, मी या कोल्हापूरचा मालक, काँग्रेसचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते माझे नोकर आहेत. हा त्यांचा अविर्भाव होता.
मधुरिमारजे या महाविकास आघाडीच्या उत्तर कोल्हापूरच्या अधिकृत उमेदवार होत्या. राजेश लाटकर यांना विरोध झाल्याने कॉँग्रेसने मधुरिमारजे यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता त्यानीच अचानक अर्ज मागे घेतल्याने आमदार सतेज पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.