...तर तुम्हीही लाडकी बहीण योजनेतून होऊ शकता बाद; गडचिरोलीत 25 हजार महिला ठरल्या अपात्र (File Photo : Ladki Bahin Yojana)
मुंबई : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच पसंतीस उतरली आहे. महिलांचा या योजनेला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यातच मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्यासह विविध 15 निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1.60 कोटी लाभार्थींना सुमारे 4,787 कोटी रुपयांचे वाटप झाल्याचेही सांगितले.
हेदेखील वाचा : आधी ‘लाडकी बहीण योजने’ला विरोध! निवडणूक जवळ येताच काँग्रेसने दिले ‘हे’ मोठे आश्वासन
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार ब्राँकायटिसची लागण झाल्यामुळे ऑनलाईन हजर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे इतर कोणतीही योजना बंद होणार नसल्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी शेतकरी कुटुंबांना देण्यात येणारी मदत बंद केल्याचे वृत्त धुडकावून लावले.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पुणे-छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा दिली जाणार आहे. शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य केले जाणार आहे. याशिवाय, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देणार असल्याचे सांगण्यात आले.
लाडक्या बहिणींना 2 हजार रुपये देणार; काँग्रेसचे आश्वासन
आमचं सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेसाठी तुम्हाला 2 हजार रुपये देणार, तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर गहाण ठेवणार आहे का, मोदी सरकारने तोडण्या फोडण्याच्या पलिकडे काय केल ते सांगा, महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपच सरकार जाईल, असेही खर्गे यांनी म्हटले. यावेळी, राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेतील पात्र महिलांना 2000 रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलंय.
हेदेखील वाचा : आमची मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं ऐकत नाही आणि इथे सरकारला वाटतंय 1500 रुपयांत त्यांचं ऐकेल… चिमुकलीचा Video Viral