नागरी संरक्षण दलाच्या मॉक ड्रीलचे आयोजन उत्साही पुणेकर मोठा संख्येने सहभागी झाले आहे
पुणे : जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याच्या नंतर देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने, केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत देशभरात विविध ठिकाणी मॉक ड्रील घेण्याबाबत सुचित केले आहे. त्यानुसार नागरिकांच्या संरक्षणासाठी तयार केलेले स्वयंसेवी संघटना म्हणजेच ‘नागरी संरक्षण दल’ आहे. हे दल महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत कार्यरत असून, याची राज्यात पुणे, ठाणे, उरण, तारापुर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक या ठिकाणी कार्यालये आहेत. या नागरी संरक्षण दलाच्या आवाहानुसार युध्दजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने जागोजागी घेण्यात आलेल्या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांचा उस्फुर्त सहभाग नोंदविला आहे.
पुणे जिल्ह्यातील नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवकांची आपत्कालीन प्रसंगी मदत होते. याच स्वयंसेवकांच्या मदतीने नुकतीच लोणीकंद येथे मॉक ड्रिल घेण्यात आली. फूड प्रोसेसिंग करणाऱ्या वेकफील्ड कंपनीचा भोंगा दुपारी 12 वा 58 मिनिटांनी वाजवून परिसरातील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला. परिसरातील सर्व नागरिक सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यासाठी एकत्र येऊन उभी राहिली. त्याच बरोबर वेकफील्ड कंपनीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी कोणतीही धावपळ न करता सुरक्षित असेंबली पॉईंटच्या ठिकाणी येऊन उभे राहिले. या वेळी स्वाती शितोळे, सौमीक बसक, केतन चव्हाण या अधिकाऱ्यांनी बाहेर आलेल्या कर्मचारी व अधिकारी यांची गणती केली व सर्व कर्मचारी सुरक्षित बाहेर आल्याची खात्री केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक अर्जुन कुऱ्हाडे व आनंद शिंदे यांनी आग म्हणजे काय?, आगीचे प्रकार, आग विजवण्याच्या पद्धती व उपाययोजना याबाबत माहिती दिली तसेच. उपविभागीय क्षेत्ररक्षक राहुल पोखरकर यांनी अग्निशामक यंत्र आग विजवण्यासाठी कसे वापरावे, घरगुती गॅस (एल.पी.जी.) घरात पसरल्यानंतर काय उपाययोजना करावी, घरगुती गॅस (एल.पी.जी.) सिलेंडरला आग लागल्यास काय करावे व आग कशी विजवावी याबाबत मार्गदर्शन केले. त्याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली येथील 108 आपत्कालीन रुग्णवाहिका उपस्थित झाली. रुग्णवाहिकेचे डॉक्टर सागर जाधव यांनी 108 आपत्कालीन रुग्णवाहिकेचे कार्यान्वित असलेली यंत्रणा, रस्ते अपघातातील रुग्ण हाताळणे, रुग्णाला स्ट्रेचरवरुन वाहून नेणे, सी.पी.आर., उष्माघात, इत्यादी बाबत मार्गदर्शन केले व रुग्णवाहिकेचे माहिती सादर केली. सदर मॉक ड्रिल वेळी होमगार्ड, आपदा मित्र, स्थानिक नागरीक, कंपनीचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, आरोग्य कर्मचारी असे एकूण 92 व्यक्तींनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत माहिती देताना नागरी संरक्षण दलाचे उपविभागीय क्षेत्ररक्षक अधिकारी राहुल पोखरकर यांनी “नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांचे कार्य पाहून सामान्य जनतेमध्ये देशसेवा करण्याची व स्वयंसेवकांप्रति अभिमान निर्माण होत आहे. यामध्ये नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी, समाजसेवक, व देश सेवा करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्ती प्रशिक्षण घेऊन यात सहभागी होऊ शकतात.” अशी माहिती राहुल पोखरकर यांनी दिली आहे.