Raigad leprosy Campaign रायगडात सापडले १५१ कुष्ठरोग बाधित रुग्ण
राज्यात कुष्ठरोग शोध अभियान! १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी
या कालावधीत आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील ५ लाख २२ हजारांहून अधिक घरांना भेटी देत प्रत्यक्ष तपासणी केली. या सर्वेक्षणात तब्बल २३ लाख २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांची शारीरिक तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान संशयास्पद लक्षणे आढळलेल्या २२ हजार ६२४ नागरिकांची वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून सखोल तपासणी करण्यात आली. त्यातून १५१ जणांना कुष्ठरोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
या मोहिमेचा मुख्य उद्देश आजाराचे लवकर निदान करून अपंगत्व टाळणे, तसेच समाजातून कुष्ठरोगाचा प्रसार पूर्णपणे रोखणे हा आहे. शहरी आणि ग्रामीण भागात एकाच वेळी सर्वेक्षण राबवून प्रशासनाने आरोग्याबाबतची सजगता दाखवली आहे.आढळलेल्या सर्व रुग्णांवर शासकीय आरोग्य संस्थांमार्फत मोफत उपचार सुरू करण्यात आले असून, नियमित तपासणी, समुपदेशन आणि आवश्यक मार्गदर्शन दिले जात आहे. वेळेत उपचार घेतल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो आणि अपंगत्व टाळता येते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
या अभियानाच्या यशासाठी आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे मोठे योगदान लाभले, असे प्रशासनाने सांगितले.दरम्यान, त्वचेवर पांढरे किंवा लाल डाग दिसणे, बधिरपणा, जखमा उशिरा भरणे किंवा संवेदना कमी होणे अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कुष्ठरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून रुग्णांबाबत सहानुभूती, स्वीकार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचेही आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
डोलोचा ओव्हरडोस कराल अन् आणखीन आजारी पडाल! लिव्हरचं होईल रामनाम
Ans: कुष्ठरोगाचे लवकर निदान करून अपंगत्व रोखणे आणि जिल्ह्यातून आजाराचे उच्चाटन करणे हा या मोहिमेचा उद्देश होता.
Ans: संसर्गजन्य कुष्ठरोग उपचार न घेतल्यास पसरू शकतो, तर असंसर्गजन्य कुष्ठरोग इतरांना लागत नाही.
Ans: त्वचेवर पांढरे किंवा लाल डाग, बधिरपणा, जखमा उशिरा भरणे, संवेदना कमी होणे ही प्रमुख लक्षणे आहेत.
Ans: होय, वेळेत निदान व योग्य उपचार केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो.
Ans:






