मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुका देखील महाविकास आघाडी एकत्र लढेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीत दिली.
लोकसभेप्रमाणेच विधानसभाही महाविकास आघाडी एकत्र लढवणार का याबाबतचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार म्हणाले की, ‘विधानसभेलाही महाविकास आघाडीने एकत्रच लढावे अशी माझी इच्छा आहे. आमचा प्रामाणिक प्रयत्नही तसाच राहील. विधानसभेला 288 जागा आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांना एकमेकांना समजून घेणे सोपे जाईल. लोकसभेला 48 जागाच होत्या. माझा पक्ष आज लहान असला तरी जनमाणसांत रुजलेला पक्ष आहे’.
बारामतीत विजय पक्का
लोकसभा निवडणुकीत बारामतीत विजयाची खात्री आहे का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही. यापूर्वी बारामतीत निवडणुकीत पैशांचा वापर कधीच व्हायचा नाही. पण या निवडणुकीत पैशांचा वापर झाला, असे लोक सांगतात. पण त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगता येणार नाही, असे पवार म्हणाले.