
Maharashtra Breaking News Updates Today:
28 Mar 2026 11:42 AM (IST)
पुणे/रायगड: पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा निसर्गरम्य मात्र आव्हानात्मक 'वरंधा घाट' (Varandha Ghat) रस्ता पुढील सव्वा महिना सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या मार्गाच्या रुंदीकरणाचे आणि मजबुतीकरणाचे काम एका अत्यंत कठीण टप्प्यावर असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग बंद राहणार आहे.
भौगोलिक आव्हानांमुळे घेतला निर्णय सध्या हिर्डोशीच्या पुढील भागात रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा परिसर भौगोलिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मानला जातो. एका बाजूला नीरा-देवघर धरणाचे विस्तीर्ण पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगररांगा, अशा अरुंद पट्ट्यात हे काम सुरू आहे. या ठिकाणी अवजड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने काम सुरू असताना वाहतूक सुरू ठेवणे प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते, ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.
28 Mar 2026 11:40 AM (IST)
अलीकडेच रिलीज झालेल्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाने जगभरात सुमारे 1000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची क्रेझ तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. धुरंधर आणि धुरंधर 2 या दोन्ही चित्रपटांमधील अभिनेता रणवीर सिंगच्या लूककडे सर्वचजण आकर्षित झाले आहेत. लोकं एआयच्या मदतीने रणवीर सिंगसारख्या लूकमध्ये स्वत:चे फोटो तयार करत आहेत. याचे प्रॉम्प्ट्स देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याच प्रॉम्प्ट्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
28 Mar 2026 11:30 AM (IST)
जेरुसलेम/तेहरान : गेल्या एक महिन्यापासून मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध (US Israel Iran War) सुरु आहे. हे युद्ध काही थांबण्याचे नाव घेईना. इस्रायल (Israel)इराण सतत एकमेकांवर हवाई हल्ले करत आहेत. यामुळे प्रचंड अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हल्ले केले आहेत. ज्यामुळे इराण भडकला असून प्रत्युत्तर देण्याची चेतावणी दिली आहे. या परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
28 Mar 2026 11:20 AM (IST)
मध्य-पूर्वेतील रणांगणावर( क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असतानाच आता ‘सायबर’ युद्धालाही सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि एफबीआय (FBI) संचालकपदाचे प्रबळ उमेदवार काश पटेल यांच्या डिजिटल सुरक्षेत मोठी गळती झाली आहे. इराणी हॅकर्सनी पटेल यांच्या वैयक्तिक ईमेल आणि संदेशांमध्ये घुसखोरी केल्याचे समोर आले असून, यामुळे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे धाबे दणाणले आहेत.
28 Mar 2026 11:10 AM (IST)
अमेरिका-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. शुक्रवारी ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल ११४ डॉलरवर पोहोचल्या. भारतासाठी कच्च्या तेलाच्या किमतीतील ही वाढ एक धक्का आहे, कारण भारत आपल्या ऊर्जेच्या गरजांपैकी सुमारे ८५% गरजा आयातीद्वारे पूर्ण करतो. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती आता अंदाजे २०२२ च्या पातळीवर आहेत, परंतु भारताला तेल खरेदी करण्यासाठी तीन वर्षांपूर्वीपेक्षा सुमारे २४% जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
28 Mar 2026 11:00 AM (IST)
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी डॉ. मैनक घोष यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. घोष हे सध्या धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत आहेत.
28 Mar 2026 10:49 AM (IST)
व्हाट्सअॅप हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेटाच्या मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे करोडो युजर्स आहेत. याच करोडो युजर्ससाठी कंपनी वारंवार नवीन फीचर्स आणि अपडेट घेऊन येत असते. आता देखील कंपनीने एक दोन नाही तर तब्बल सात नवीन फीचर्स एकाच वेळी रोल आउट केले आहे. आता व्हाट्सअॅपचा वापर करणारे युजर्सना स्टोरेजची कोणतीही चिंता राहणार नाही. तसेच युजर्सना एकच ॲपमध्ये दोन व्हाट्सअॅप अकाउंट लॉगिन करण्याची सुविधा देखील मिळणार आहे. तसेच मेटाने या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये काही एआय फिचर्सचा देखील समावेश केला आहे.
28 Mar 2026 10:40 AM (IST)
पांड्याने मैदान कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची दखल घेतली आणि त्यांची भरभरून प्रशंसा केली. त्याने त्यांचे ऋण फेडण्याचे वचन दिले. पांड्याने आपले वचन पूर्ण केले. गुरुवारी, पांड्याने वानखेडे स्टेडियमच्या मैदान कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. टीम इंडियाच्या या अष्टपैलू खेळाडूने त्या प्रत्येकाला भेटवस्तू आणि आर्थिक मदत दिली.
28 Mar 2026 10:32 AM (IST)
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय अविवाहित तरुणी आणि तिच्या सात महिन्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथे घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना तपासाला सुरुवात केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेने खळबळ उडाली
28 Mar 2026 10:24 AM (IST)
नेपाळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह (Balen Shah) यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत अत्यंत कठोर पाऊल उचलते नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे संपूर्ण नेपाळमध्ये खळबळ माजली आहे.
28 Mar 2026 10:16 AM (IST)
पिंपरी-चिंचवड परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केल्याने एका २२ वर्षीय अविवाहित तरुणीचा आणि तिच्या महिन्यांच्या नवजात अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, असुरक्षित गर्भपाताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
28 Mar 2026 10:09 AM (IST)
आयपीएल २०२६ आजपासून शुभारंभ होणार आहे, नव्या सिझनची मागील काही दिवसांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मिडियावर सध्या या सिझनची मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळाली. आयपीएल २०२६ चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाईल. हा सामना शनिवारी बंगळूर येथे होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड सलामीच्या सामन्यात संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये नसेल.
28 Mar 2026 09:05 AM (IST)
पिंपरी-चिंचवड: औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केल्याने झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे एका २२ वर्षीय अविवाहित तरुणीचा आणि तिच्या सात महिन्यांच्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, असुरक्षित गर्भपाताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
28 Mar 2026 09:00 AM (IST)
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी आणि अत्यंत थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेमाला विरोध करणाऱ्या पोलीस पित्याचा काटा काढण्यासाठी, स्वतःच्या पोलीस मुलीनेच प्रियकराच्या मदतीने त्यांना विष देऊन ठार केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ही हत्या तीन वर्षांपूर्वी झाली होती, मात्र रामनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत आता आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
१३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि पित्याचा विरोध मृत जयंत बाल्लावार (वय ४५) हे पोलीस दलात कार्यरत होते. त्यांची मुलगी आर्या बाल्लावार (वय २२) हिचे पोलीस कॉन्स्टेबल आशिष महेश शेडमाके (वय ३०) याच्याशी गेल्या १३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधांना जयंत बाल्लावार यांचा तीव्र विरोध होता. याच विरोधातून संतापलेल्या आर्या आणि आशिष यांनी वडिलांना संपवण्याचा कट रचला.
28 Mar 2026 08:55 AM (IST)
मुंबई: राज्यात सध्या गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही बड्या शासकीय अधिकाऱ्यांचे कनेक्शन समोर येत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. राज्य सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा ८ वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशोक खरातच्या अटकेपूर्वी शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन आयएएस अधिकाऱ्यांसोबत त्याची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने पहिल्यांदाच एका उपजिल्हाधिकाऱ्याची (अभिजीत भांडे पाटील) तडकाफडकी बदली केली आहे.
28 Mar 2026 08:50 AM (IST)
बीड (परळी): परळी बसस्थानक परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या काळजाच्या तुकड्याला, म्हणजेच अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीला अनोळखी महिलांच्या ताब्यात देऊन एक निर्दयी माता तिथून पसार झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
"बाथरूमला जाऊन येते" सांगून काढता पाय मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बसस्थानकात दोन प्रवासी महिलांजवळ आली. "मी बाथरूमला जाऊन येते, तोपर्यंत माझ्या मुलीला जरा सांभाळा," असे विश्वासाने सांगून तिने त्या चिमुकलीला त्यांच्या स्वाधीन केले. मात्र, बराच वेळ उलटूनही ती महिला परत आली नाही. त्या प्रवासी महिलांनी बसस्थानक परिसर आणि आजूबाजूला तिचा शोध घेतला, मात्र त्या मातेचा कुठेही पत्ता लागला नाही.
28 Mar 2026 08:45 AM (IST)
नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचा पाढा आता अधिकृतपणे वाचला जाऊ लागला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी खरातविरोधात दोन गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये एका महिलेवर केलेला लैंगिक अत्याचार (Sexual Assault) आणि आर्थिक फसवणुकीचा समावेश आहे. या धक्कादायक खुलाशामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
संसारातील विघ्न दूर करण्याच्या बहाण्याने अत्याचार मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचे पती २०१३ मध्ये विवाहबद्ध झाले होते, परंतु त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याने ते एकत्र राहत नव्हते. आपला संसार पुन्हा सुरळीत व्हावा, या आशेने हे दाम्पत्य एका व्यक्तीच्या सल्ल्यानुसार २०२२ मध्ये पहिल्यांदा अशोक खरातकडे गेले होते. त्यानंतर २०२४ मध्ये ते पुन्हा त्याच्या संपर्कात आले. याच भेटीदरम्यान खरातने आपल्या क्रूर हेतूने पीडितेच्या पतीला केबिनबाहेर जाण्यास सांगितले.
28 Mar 2026 08:40 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 27 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,472 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,266 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,854 रुपये आहे. भारतात 27 मार्च रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,32,660 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,44,720 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,540 रुपये आहे. भारतात 27 मार्च रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 239.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,39,900 रुपये आहे.
28 Mar 2026 08:40 AM (IST)
प्रवासाचा आनंद तेव्हा वाढतो जेव्हा त्यात कंफर्ट ॲड होतो. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमान प्रवास सर्वात वेगवान पर्याय मानला जातो. पण यात सीट्सवर अधिक काळ बसून आपला कंफर्ट कुठेतरी हरवतो. विमानाच्या सीट्सवर फार काळ बसल्याने आपल्या हाता-पायांंमध्ये वेदना होऊ लागतात तसाच आपला प्रवास अनुभव अधिक थकवणारा बनतो. यामुळे मळमळ, चक्कर येणे, थकवा अशा बऱ्याच समस्या जाणवू लागतात. पण आता या सर्व समस्याांना दूर करता येणार आहे कारण युनायटेड एअरलाइन्स अलिकडे एक नवा उपक्रम घेऊन आली आहे ज्यानुसार लांब पल्ल्याच्या विमानांमधील इकॉनॉमी सीट्सचे आता सोफ्यांमध्ये रुपांतर केले जाईल. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. वाचा सविस्तर-
28 Mar 2026 08:36 AM (IST)
US-Israel Iran War News: मध्य पूर्व आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या जुन्या आणि विश्वासू मित्रांसोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यास सुरुवात केली आहे. एका मोठ्या राजनैतिक विजयामध्ये, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच रशिया भारताला थेट ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ (LNG) विक्री पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे.
‘रॉयटर्स’ने दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, भारत या करारावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत आहे. जरी या व्यवहारामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांचे उल्लंघन होण्याचा धोका असला, तरी राष्ट्रीय हित लक्षात घेऊन भारत ही चर्चा काही आठवड्यांतच पूर्ण करू शकतो. रशियाकडून थेट गॅस पुरवठा सुरू होणे हा भारतासाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
Rupali chakankar Resign Breaking: अखेर रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Rupali Chakankar Resign Breaking: अखेर रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. खरात यांना ‘गुरू’ मानणाऱ्या चाकणकर यांच्यावर या प्रकरणामुळे पक्षांतर्गत आणि राजकीय स्तरातून मोठा दबाव निर्माण झाला होता.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर, आता त्यांनी पक्षीय संघटनेतील महत्त्वाच्या पदाचाही त्याग केला आहे. खरात यांच्याशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे झालेल्या आरोपांनंतर, पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे . या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत आता मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, आगामी काळात हे पद कोणाकडे सोपवले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.