पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा (फोटो सौजन्य-X)
Devendra Fadnavis on Pahalgam terror attack in Marathi: पहलगाम हल्ल्यातील मृतांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्रातील पहलगाम हल्ल्यात मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही घेतला आहे. संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मृत्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच, प्रत्येक कुटुंबातीला एकाला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार कुटुंबाच्या शिक्षणावर आणि रोजगारावर लक्ष देणार आहे.
याआधी आसावरी जगदाळेंना पुण्यातील डी.वाय.पाटील संस्थेमध्ये नोकरी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानंतर आता त्यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विशेषाधिकाराचा वापर करून मृतांच्या कुटुंबातील एकमेव व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.
असावरी जगदाळे यांनी कॉम्प्युटर सायन्समधून बीएसस्सी केली. त्यानंतर एमबीएची पदवी घेतली. नंतर त्यालाच पुरक असा लेबर लॉचा डिप्लोमा केला आहे. आता आमचे जे नुकसान झाले आहे ते कुणीही भरून काढू शकत नाही. पण आता मुलीला सरकारी नोकरी मिळाली
१) अतुल मोने – डोंबिवली
२) संजय लेले – डोंबिवली
३) हेमंत जोशी – डोंबिवली
४) संतोष जगदाळे – पुणे
५) कौस्तुभ गणबोटे – पुणे
६) दिलीप देसले – पनवेल