Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra to World Breaking News: आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 06, 2026 | 08:53 AM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:

बारावी पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांना गुणसुधाराची सुवर्णसंधी

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीच्या मुख्य निकालानंतर आता पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा कमी गुणांमुळे श्रेणीसुधार (Class Improvement) करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज, मंगळवार ५ मे पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

The liveblog has ended.
  • 05 May 2026 05:59 PM (IST)

    05 May 2026 05:59 PM (IST)

    आरोपी कांबळेच्या पत्नीचा संताप

    नसरापूर प्रकरणात आरोपी कांबळेच्या पत्नीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. “फाशी नको, नराधमाला ठेचून मारा,” अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलं आहे.

  • 05 May 2026 05:49 PM (IST)

    05 May 2026 05:49 PM (IST)

    नराधमाला फाशी मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही' ज्योती वाघमारे

    'नराधमाला फाशी मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही' ज्योती वाघमारे यांचा ठाम निर्धार ‎देशातील प्रत्येक मुलींनी सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. जो नराधम साडे तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतो त्याला राहण्याचा अधिकार नाही. त्याला फासावरच लटकला पाहिजे. ‎ ‎ मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून एसीमध्ये बसून प्रतिक्रिया देणे योग्य नाही. आमदार,खासदार असण्यापेक्षा सोलापूरची लेक आहे. ‎ ‎ सोलापूरच्या लेकीसाठी न्याय मागताना माजी खासदारकी आडवी येणार नाही. कारण हा संघर्ष करतच मी पुढे आली आहे. ‎ ‎ त्या महिलांचा आक्रोश आहे की त्या नराधमाला खेचून मारला पाहिजे,भर चौकात फाशी दिली पाहिजे आम्ही त्यांच्या भावनाशी सहमत आहोत.

  • 05 May 2026 05:35 PM (IST)

    05 May 2026 05:35 PM (IST)

    'फाशी नको नराधमाला ठेचून मारा' नरसापूर आरोपी कांबळेच्या पत्नीचा संताप

    नरसापूर प्रकरणात आरोपी कांबळेच्या पत्नीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. “फाशी नको, नराधमाला ठेचून मारा,” अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलं आहे. 

  • 05 May 2026 05:27 PM (IST)

    05 May 2026 05:27 PM (IST)

    पुण्यात दोन पोलिस अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

    पुण्यात लाच प्रकरणामुळे दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. एपीआय वैशाली तोटेवार आणि पीएसआय मनोज बरुरे यांना लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर निलंबित करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सलग कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

  • 05 May 2026 05:16 PM (IST)

    05 May 2026 05:16 PM (IST)

    पश्चिम बंगालात भाजपच्या विजयानंतर १५ वर्षांनी मंदिराचे दरवाजे खुले

    पश्चिम बंगालमध्ये अलीकडील राजकीय बदलांनंतर एक महत्त्वाची घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १५ वर्षांपासून बंद असलेले एक मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

  • 05 May 2026 04:50 PM (IST)

    05 May 2026 04:50 PM (IST)

    शिवरायांच्या नावाने मते मागणारे सरकार गप्प का?

    NCERT कडून शालेय पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास दर्शवणारा 'अटक ते कटक' हा नकाशा वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अन्यायाविरोधात आणि सरकारच्या निष्क्रियतेविरोधात नागपूरचे श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांनी तीव्र संताप व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारवर सडकून टीका केली आहे. ११ मार्च २०२६ रोजी शिक्षण राज्यमंत्र्यांनी विधान परिषदेत कबुली दिली होती की, उर्दू आणि हिंदी माध्यमातून हा नकाशा गायब आहे. मात्र, केंद्र सरकारला पत्र लिहूनही त्याची दखल घेतली गेली नाही. उलट, त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातूनही तो नकाशा हटवण्यात आला. मुधोजीराजे यांचे सहकारी ऋषिकेश निकम यांनी माहिती अधिकाराचा (RTI) वापर केल्यानंतर हे वास्तव समोर आले. वारंवार पत्रव्यवहार आणि मुलाखती देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. .

  • 05 May 2026 04:45 PM (IST)

    05 May 2026 04:45 PM (IST)

    नागला बंदरात अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने उघडली मोठी मोहीम

    वसईतील नागला बंदर परिसरात अवैध रेती उपसा करणाऱ्या माफियांविरोधात प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली असून अनेक ठिकाणी तपासणी करून बेकायदेशीर रेती उत्खननावर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाच्या या पावलाचे स्थानिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

  • 05 May 2026 04:40 PM (IST)

    05 May 2026 04:40 PM (IST)

    संतापाचा उद्रेक; चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो रस्त्यावर!

    नसरापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. पीडितेला न्याय मिळावा यासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महिलांची विशेषतः मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. आंदोलना दरम्यान आरोपी विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात येत न्यायाची जोरदार मागणी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक नगरसेविका आणि शेकडो सोलापूरकर सहभागी झाले होते. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवला.

  • 05 May 2026 04:35 PM (IST)

    05 May 2026 04:35 PM (IST)

    एमएमआरडी अधिकाऱ्यांसह महापौरांचा रेल्वे उड्डाण पुलांसाठी पाहणी दौरा

    विरार-नालासोपारा परिसरातील रेल्वे उड्डाण पुलांच्या कामाला लवकरच गती मिळण्याची शक्यता आहे. एमएमआरडी अधिकाऱ्यांसह महापौरांनी संबंधित ठिकाणांची पाहणी करून प्रकल्पाचा आढावा घेतला. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे पूल अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, स्थानिकांकडूनही या कामाची दीर्घकाळापासून मागणी होती. पाहणी दौऱ्यानंतर काम लवकर सुरू होण्याचे संकेत देण्यात आले असून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

  • 05 May 2026 04:30 PM (IST)

    05 May 2026 04:30 PM (IST)

    बीडमध्ये संतापाचा उद्रेक! तोंडावर काळी पट्टी बांधून नरसापूर घटनेचा सर्वपक्षीय निषेध

    पुण्याच्या नसरापूरमध्ये चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांकडून बीडमध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी महिलांना.. नको मानधन, द्या संरक्षण आणि आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या‌‌. तर चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेचा बीड जिल्ह्यात सर्वच स्तरातुन निषेध नोंदवला जात आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी यासाठी तर कायदा करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतच्या मागण्यांची निवेदन दिले. .

  • 05 May 2026 04:25 PM (IST)

    05 May 2026 04:25 PM (IST)

    विरार-नालासोपारा करांना दिलासा! रेल्वे उड्डाण पुलांच्या कामातील अडथळे दूर; लवकरच मार्गी लागणार

    विरार आणि नालासोपारा येथील वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चार रेल्वे उड्डाणपुलांच्या कामाला आता वेग येणार आहे. या संदर्भात नुकतीच एमएमआरडीए (MMRDA) अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये पुलांच्या कामात येणाऱ्या तांत्रिक आणि इतर समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.रेल्वे प्लॅटफॉर्मचे काम आणि रेल्वे रुंदीकरणामुळे पुलाच्या कामाला विलंब होत होता. मात्र, आता हे अडथळे दूर झाले आहेत.

  • 05 May 2026 04:20 PM (IST)

    05 May 2026 04:20 PM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून इंधन टंचाई

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून इंधन टंचाई जाणवत आहे. यामुळे पंपांवर पेट्रोल-डिझेल मिळविण्यासाठी रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालीत. पण इंधन तुटवड्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात सर्वत्र इंधन पुरवठा सुरळीत नसून केवळ सकाळी आणि संध्याकाळी इंधन उपलब्ध होत आहे. त्यामुळे पंपांवर रांगा दिसून येत आहेत.

  • 05 May 2026 04:15 PM (IST)

    05 May 2026 04:15 PM (IST)

    १५ किलो तेलाचा डबा चोरी करणारा आरोपी अटकेत

    मीरा रोडच्या शांतिनगर परिसरात चोरीच्या एका घटनेचा उलगडा झाला आहे. नया नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने एका चोराला अटक केली आहे।
    मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने भरदिवसा एका दुकानाबाहेर ठेवलेला १५ किलो तेलाचा डबा चोरून आपल्या स्कूटीवर ठेवून पळ काढला होता. ही संपूर्ण घटना दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती।या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास गतीने सुरू केला आणि अखेर आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे. सध्या पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

  • 05 May 2026 04:10 PM (IST)

    05 May 2026 04:10 PM (IST)

    वसई-विरारमध्ये “ड्रग्स मुक्त भारत अभियान” अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई!

    २८ एप्रिल ते ४ मे २०२६ दरम्यान मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-२ वसई क्षेत्रात विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत तब्बल १४ लाख ५९ हजार रुपयांचा नशीला माल जप्त करण्यात आला आहे. माणिकपूर, वसई, नायगाव, वालीव, आचोळे आणि तुलींज पोलीस ठाण्यांत १७ पजेशन गुन्हे दाखल करण्यात आले, तर १५८ ड्रग्स सेवन प्रकरणांमध्ये आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, १३४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तर वारंवार ड्रग्स तस्करी करणाऱ्या ८ आरोपींवर PIT NDPS कायद्यांतर्गत प्रस्ताव पाठवण्यात आला तर एकूण 22,38,385 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • 05 May 2026 04:01 PM (IST)

    05 May 2026 04:01 PM (IST)

    भिवंडीत नशेच्या सौदागरांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गुटखा जाळून आंदोलन

    भिवंडीत नशेची सौदागिरी सुरू असल्याने याविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी गुटखा जाळून नशेच्या सौदागरांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येवून संबंधित प्रशासनाने नशेची सौदागिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

  • 05 May 2026 04:00 PM (IST)

    05 May 2026 04:00 PM (IST)

    व्हेज स्टार्टर्ससाठी पदार्थ शोधताय? मग कुरकुरीत Threaded Paneer ठरेल परफेक्ट पर्याय

    भारतीय स्वयंपाकात पनीरचे अनेक प्रकार आढळतात, पण सादरीकरणात वेगळेपणा आणणाऱ्या काही रेसिपीज खास लक्ष वेधून घेतात.\थ्रेडेड पनीर ही अशीच एक आकर्षक आणि चविष्ट डिश आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असा हा कॉम्बिनेशन खूपच स्वादिष्ट लागतो. पार्टी, किटी, किंवा खास पाहुण्यांसाठी काहीतरी हटके बनवायचं असेल तर थ्रेड पनीर उत्तम पर्याय आहे.

  • 05 May 2026 03:50 PM (IST)

    05 May 2026 03:50 PM (IST)

    Cabinet Decision : मोठी बातमी! आदिवासी शिक्षणाला चालना

    Maharashtra Cabinet Decision News Marathi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (५ मे) महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी निर्णय घेण्यात आला असून, सोलापूरच्या शासकीय तंत्रानिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष (२०२६-२७) पासून पदवी स्तरावरील तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आणि श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात फायदा होईल आणि आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल.

  • 05 May 2026 03:40 PM (IST)

    05 May 2026 03:40 PM (IST)

    CSK Vs DC Pitch Report: आज घनघोर युद्ध होणार! चेन्नई अन् दिल्ली खेळणार

    Tata IPL 2026 CSK Vs DC Live Updates: आज दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलचा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. प्ले ऑफमध्ये (IPL 2026) जाण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात. आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघ सध्या पॉइंट टेबलमध्ये 8 पॉईंट्ससह 6 आणि 7 व्या स्थानी आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी अनिवार्य असणार आहे.

  • 05 May 2026 03:30 PM (IST)

    05 May 2026 03:30 PM (IST)

    Beed Crime: बीड हादरलं! धारूरमध्ये पोलिसांवर भीषण दगडफेक

    Beed Crime: बीड जिल्ह्यातील धारूर येथे गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपींनी भीषण दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक भवर हे जखमी झाले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. मध्यरात्री पेट्रोलिंगदरम्यान कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस पथकावर मद्यधुंद टोळक्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर थोडक्यात बचावले.

  • 05 May 2026 03:20 PM (IST)

    05 May 2026 03:20 PM (IST)

    NEET 2026 Exam Success Story: ७० व्या वर्षी डॉक्टर बनण्याचं स्वप्न!

    NEET 2026 Exam Success Story Ashok Bahar : नुकत्याच नीट २०२६ च्या परीक्षा झाल्या असून परीक्षेदरम्यान एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दृश्य पहायला मिळाले. हजारो तरूण डॉक्टर बनण्यासाठी स्पर्धा करत असताना ७० वर्षीय अशोक बहार यांनी आपल्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी स्पष्ट केले, परीक्षा देणे त्यांच्यासाठी पर्याय नसून त्यांच्या दिवंगत आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पण त्यांची अढळ जिद्द त्यांना या वयात वैद्यकीय जगाची पायरी ओलांडण्यास मदत करेल का?

  • 05 May 2026 03:10 PM (IST)

    05 May 2026 03:10 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणनेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

    छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): जनगणना-२०२७ मोहिमेच्या प्रारंभीच संभाजीनगर शहरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. केवळ तीन दिवसांत १० हजारांहून अधिक नागरिकांनी स्वयं-नोंदणी करत सहभाग नोंदवला असून, त्यातील ७,६११ जणांनी आपली माहिती पूर्णपणे भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे. डिजिटल माध्यमातून जनगणनेला मिळालेला हा प्रतिसाद प्रशासनासाठी दिलासादायक मानला जात आहे.

  • 05 May 2026 03:04 PM (IST)

    05 May 2026 03:04 PM (IST)

    पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा!

    छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर जिल्ह्यात मृद जलसंधारणाची कामे वेळत व पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. त्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने समन्वय राखून काम करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सोमवारी दिले. जलयुक्त शिवार २.० अंतर्गत आज जिल्ह्यातील जलसंधारण कामांचा आढावा घेण्यात आला. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध जलसंधारण उपचार उपाययोजना राबविणाऱ्या यंत्रणांचा आढावा घेण्यात आला.

  • 05 May 2026 02:58 PM (IST)

    05 May 2026 02:58 PM (IST)

    सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नसरापूर घटनेचा निषेध

    आंदोलनात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. १९९८लाच आरोपीला फाशी दिली असती तर असं कृत्य पुन्हा केलं नसतं असं म्हणत निषेध केला जात आहे. महिला अत्याचारासाठी वेगळा फास्टट्रॅक असावा अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.

  • 05 May 2026 02:48 PM (IST)

    05 May 2026 02:48 PM (IST)

    मुरबाड माळशेज महामार्गावर भीषण अपघात

    मुरबाड माळशेज घाट महामार्गावरील वैशाखरे वळणावर एसटी बस आणि कार यांच्यात समोरा समोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून या अपघातात एक पुरुष एक महीला जागीच ठार झालीय, तर लहान मुलासह पाचजण गंभीर झाले आहेत. कल्याण आहील्यानगर वैशाखरे वळणावर कल्याण-नगर एसटी बस आणि स्कॉर्पिओ कार यांच्यामध्ये ओवरटेक करताना हा अपघात झालाय. जखमींवर मुराबडच्या टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी टोकावडे महामार्ग पोलिस पोहचले असून पुढील तपास करत आहेत.

  • 05 May 2026 02:39 PM (IST)

    05 May 2026 02:39 PM (IST)

    सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला; बँकिंग क्षेत्रावर दबाव

    आज भारतीय शेअर बाजारात दुपारपर्यंत सेन्सेक्स तब्बल 500 अंकांनी खाली आला. तर निफ्टीही 135 अंकांनी घसरला. दरम्यान बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते. यात बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, रिअल्टी आणि मेटल क्षेत्रांमध्ये सर्वाधिक दबाव दिसून आला.

  • 05 May 2026 02:30 PM (IST)

    05 May 2026 02:30 PM (IST)

    पंढरपूर कॉरिडॉरला अखेर शिखर समितीची मंजुरी; ३० महिन्यांत काम पूर्ण करण्याचे निर्देश

    पंढरपूर येथील बहुचर्चित कॉरिडॉर प्रकल्पाला अखेर मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीकडून मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून गेल्या दोन वर्षांपासून या योजनेची चर्चा सुरू होती. या प्रकल्पाचे काम ३० महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. कॉरिडॉरमुळे पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तथापि, प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या स्थानिक नागरिकांचा विरोध अद्याप कायम आहे. दुसरीकडे, भाविक आणि वारकरी यांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

  • 05 May 2026 02:22 PM (IST)

    05 May 2026 02:22 PM (IST)

    रायगडच्या राजकारणात मोठी घडामोड दोन विरोधक एकत्र?

    कर्जतचे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला राजकीय वाद अखेर संपुष्टात आलाय. खुद्द आमदार महेंद्र थोरवे यांनीच याचे सुतोवाच केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. विधानसभा निवडणुकीत तटकरेंनी आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप थोरवे यांनी वारंवार केला होता. तर तटकरेंनीही थोरवेंच्या विरोधात सुधाकर घारेंना बळ दिले होतं. मात्र, आता हे दोन्ही नेते एकत्र काम करणार असून, रायगडच्या राजकारणात ही मोठी उलथापालथ मानली जात आहे.

     

  • 05 May 2026 02:10 PM (IST)

    05 May 2026 02:10 PM (IST)

    पुण्यात नागरिकांकडून कालाकृतीची विटंबना

    Pune मध्ये नागरिकांकडून एका कलाकृतीची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत असून सांस्कृतिक वारशाच्या जतनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

     

  • 05 May 2026 02:00 PM (IST)

    05 May 2026 02:00 PM (IST)

    Xiaomi चाहत्यांना धक्का! कंपनी ‘या’ फोल्डेबल फोनला करणार ‘Good Bye’? कारण काय? जाणून घ्या

    टेक कंपनी Xiaomi ने त्यांच्या करोडो चाहत्यांना एक मोठा झटका दिला आहे. चिनी ब्रँड एक फोल्डेबल लाइनअप बंद करण्याची तयारी करत आहे. हे लाईनअप Mix Flip असल्याचे सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार, कंपनी यावर्षी या लाईनअपअंतर्गत फोन लाँच करणार नसल्याची माहिती आहे. तसेच भविष्यात देखील ही लाईनअप लाँच करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने त्यांच्या फ्लिप फोनच्या पुढील व्हेरिअंटला रामराम केले आहे, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.

  • 05 May 2026 01:55 PM (IST)

    05 May 2026 01:55 PM (IST)

    फलटण दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

    राज्य शासनाच्या ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ या धोरणाच्या अंमलबजावणीवर सातारा जिल्ह्यात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. फलटण येथील दुय्यम निबंधक क्रमांक दोन कार्यालयात अनियमितता आणि संभाव्य आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी चौकशीची मागणी केली आहे.

  • 05 May 2026 01:55 PM (IST)

    05 May 2026 01:55 PM (IST)

    संघर्षातून उद्योजकतेकडे! विदर्भातील महिलांचे सक्षमीकरण: आर्थिक स्‍वावलंबीत्वाचा नवा मार्ग

    पहाटे सूर्य उगावण्‍यापूर्वीच अनेक महिला जाग्या झालेल्या असतात. या महिला धार काढणे, चारा देणे आणि गुरांच्या आरोग्याची तपासणी करणे अशा कामात मग्न असतात. गावोगावी दररोज सकाळी हेच दृश्य पाहायला मिळते. ग्रामीण दुग्धव्यवस्थेला कार्यरत ठेवणाऱ्या एकूण कामांपैकी जवळपास ७० टक्‍के काम या महिलाच पार पाडतात.

  • 05 May 2026 01:50 PM (IST)

    05 May 2026 01:50 PM (IST)

    पवनचक्क्यांची केबल चोरी करणारी टोळी जेरबंद; 1 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

    पाटण तालुक्यातील पवनचक्क्यांमधून तांब्याच्या तारांसह केबलची चोरी करणाऱ्या टोळीचा सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि पाटण पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • 05 May 2026 01:45 PM (IST)

    05 May 2026 01:45 PM (IST)

    आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना! मुंबईत लोकसहभाग वाढण्यासाठी पालिकेचे प्रशिक्षण शिबिरांवर भर

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत यावर्षी मुंबई शहरातील वृक्षगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम ‘सार आयटी रिसोर्सेस’ या खाजगी कंपनीमार्फत राबवण्यात येत आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील प्रत्येक वृक्षाची नोंद केवळ कागदोपत्री न राहता, आधुनिक उपकरणांच्या आणि विशेष मोबाईल ॲपच्या सहाय्याने शाखीय पद्धतीने घेतली जाणार आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात लोकसहभाग वाढवण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. या गणनेत जास्तीत जास्त वृक्षप्रेमी, पर्यावरणतज्ज्ञ, वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी आणि महापालिकेच्या उद्यान विभागासह इतर विभागांतील अधिकारी सहभागी व्हावेत, असा पालिकेचा प्रयत्न आहे.

  • 05 May 2026 01:35 PM (IST)

    05 May 2026 01:35 PM (IST)

    ‘हे खपून घेणार नाही’ , UAE वरील हल्ल्यात भारतीय जखमी झाल्याने सरकार संतप्त, इराणला थेट सुनावलं

    पश्चिम आशियातील तणाव कमालीचा वाढला आहे. सोमवारी (०४ मे) इराणने संयुक्त अरब अमिराती(UAE) च्या तेल बंदरावर हल्ला केला आहे. या हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे यूएईच्या फुजैराह पेट्रोलियम इंडस्ट्रीज झोनमध्ये स्फोट झाला असून आग लागली आहे. यामध्ये तीन भारतीय जखमी झाले आहेत. या घटनेवर भारताने तीव्र संताप व्यक्त करत इराणला सुनावलं आहे.

  • 05 May 2026 01:25 PM (IST)

    05 May 2026 01:25 PM (IST)

    हेरिटेज वॉकमुळे दुर्मीळ इतिहास उजेडात; उपक्रमाला नागरिक, पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    पुणे शहरात सध्या सुरू असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाला नागरिक आणि पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामुळे शहरातील केवळ प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळेच नव्हे, तर अनेक दुर्लक्षित आणि लपलेली वारसास्थळे नव्याने समोर येत आहेत. परिणामी, पुणेकरांमध्ये आपल्या इतिहासाबद्दल नव्याने जागरूकता निर्माण होत आहे. हेरिटेज वॉकमध्ये शनिवार वाडा, लाल महाल आणि कसबा गणपती मंदिर यांसारख्या प्रमुख स्थळांसोबतच कमी परिचित भागांचा समावेश केला जात आहे.

  • 05 May 2026 01:15 PM (IST)

    05 May 2026 01:15 PM (IST)

    Ranabaali चित्रपटातील O Mere Saajan गाण्याचा जलवा, Social Media वर धुमाकूळ

    2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक, ‘राणाबली’मध्ये विजय देवरकोंडा एका दमदार योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर त्यांच्यासोबत रश्मिका मंदाना ‘जयम्मा’च्या भूमिकेत झळकणार आहे! हा चित्रपट विजय आणि रश्मिकाच्या लग्नानंतरचा पहिला चित्रपट असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

  • 05 May 2026 01:08 PM (IST)

    05 May 2026 01:08 PM (IST)

    ‘या’ अभिनेत्रीने उघड केलं नात्यातील काळं सत्य; चुलत भावाविरुद्ध गंभीर आरोप

    महिला सक्षमीकरणाचे कितीही गोडवे गायले तरी लैंगिक शोषणाला त्या बळी पडतातच. कधी बाहेरच्या व्यक्ती तर कधी घरातील अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. सध्या पुण्यातील पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक शोषण करुन तिची हत्या झाल्यानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणी आला आहे. याच मुद्याला जोडून आता मनोरंजन विश्वातून देखील खळबळजनक बातमी समोर आली आहे. टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या चुलत भावाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे कनिका मान. कनिका सध्या नागिनच्या 7 (Naagin 7) सिझनमध्ये खलनायिकेच्या भुमिकेत आहे.

  • 05 May 2026 01:02 PM (IST)

    05 May 2026 01:02 PM (IST)

    कौटुंबिक वादातून सासऱ्याने केला सुनेचा खून

    धायरी येथील रायकर मळा भागात कौटुंबिक वादातून सासऱ्यानेच सुनेचा खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. सासऱ्याने सुनेचे डोके भिंतीवर आपटून तसेच दगडाने मारहाण करून तिचा खून केला आणि घराला कुलूप लावून सासरा पसार झाला आहे. पोलिस पसार झालेल्या सासऱ्याचा शोध घेत असून, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्वाती तेजस चौधरी (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सासरे भानुदास भास्कर चौधरी यांच्यावर नांदेड सिटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुटूंबियांनी तक्रार दाखल केली आहे.

  • 05 May 2026 12:48 PM (IST)

    05 May 2026 12:48 PM (IST)

    वाघोलीतून आणखी एक ड्रग्ज रॅकेट उघड

    वोघीली परिसरातून पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले असून, दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी तब्बल सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३४ लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. लोणीकंदमधील काटेवाडी फाटा व पेरणे फाटा या परिसरात कारवाया करण्यात आल्या आहेत. पुंपाजी जयचंद्र चौधरी (वय ४०, रा. बुलढाणा), राजेंद्र केरू टेळे (वय ३५, रा. शिक्रापूर), करन सचिन मोहिते (वय २१, सणसवाडी), भागीरथसिंग सज्जनसिंग राजपुरोहित (वय २८), आदिनाथ दशरथ शिर्के (वय २९, मांजरी) आणि योगेश लक्ष्मण चव्हाण (वय ३७, रा. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनिता रोकडे, उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे तुकाराम सुरवसे, पोलिस अंमलदार कैलास सांळुके, स्वप्नील जाधव व त्यांच्या पथकाने केली आहे.

  • 05 May 2026 12:36 PM (IST)

    05 May 2026 12:36 PM (IST)

    संशयास्पद महिलेला पकडले

    पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवांना ऊत आला असतानाच, काळभोरनगर परिसरात सोमवारी दुपारी एका संशयास्पद महिलेने एका बालकाला जवळ बोलावून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, संबंधित मुलाने प्रसंगावधान दाखवत तिथून धूम ठोकल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास काळभोरनगर परिसरात एक अनोळखी महिला बराच वेळ घुटमळत होती. परिसरात खेळत असलेल्या एका लहान मुलावर तिची नजर पडली. तिने त्याला खुणावून जवळ बोलावले आणि त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. मात्र, त्या महिलेच्या हालचाली आणि बोलण्यावरून त्या चिमुरड्याला धोक्याची जाणीव झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने क्षणाचाही विलंब न लावता तेथून पळ काढला आणि थेट घर गाठून पालकांना हकीकत सांगितली.

     

  • 05 May 2026 12:24 PM (IST)

    05 May 2026 12:24 PM (IST)

    महापौरांच्या फोटोमुळे सोशल मीडियावर संताप

    महाराष्ट्र दिनी दिमाखात लोकांसाठी खुला झालेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सध्या सेल्फी आणि रिल्स बनवणाऱ्यांच्या विळख्यात सापडला आहे. जगातील सर्वात रुंद बोगदा आणि देशातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून फोटो काढणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मात्र, याच ठिकाणी पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनी धावत्या प्रवासात वाहन थांबवून फोटो काढल्याने, “नियम फक्त सामान्यांसाठीच का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सोमवारी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी मुंबईला जात होते. यावेळी मिसिंग लिंकवरून जात असताना पुलाच्या भव्यतेमुळे त्यांनी वाहन थांबवून छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रकल्पाचे कौतुक केले. “विकास केवळ दिसत नाही, तो प्रत्येक प्रवासात जाणवतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, ज्या ठिकाणी सामान्य वाहनचालकांना थांबण्यास बंदी आहे, तिथे लोकप्रतिनिधीनेच नियम मोडल्याने वादाला तोंड फुटले आहे.

  • 05 May 2026 12:12 PM (IST)

    05 May 2026 12:12 PM (IST)

    हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

    भाजपा व संघ परिवारातील लोक सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करत आहेत. छत्रपतींचा इतिहास विकृत करण्याचे काम केले जात आहे. गोलवलकर, सावरकर यांच्यापासून भगतसिंह कोश्यारी, राहुल सोलापूरकर, कोरटकर यांच्यासारख्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला पण त्यांच्यावर कारवाई मात्र केली नाही. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास विरोध करणारे संघ विचाराचे लोक होते, सावित्रीबाईंनाही याच विचाराने विरोध केला, आणि त्याच विचाराचे फडणवीस आज सत्तेत आहेत. परंतु प्राण गेला तरी शिव, शाहु, फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाला बदलू देणार नाही, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

  • 05 May 2026 12:05 PM (IST)

    05 May 2026 12:05 PM (IST)

    आसाम, पश्चिम बंगाल, पांडुचेरीत भाजपचा कमळ फुललं

    आसाम, पश्चिम बंगाल आणि पांडुचेरी या राज्यांमध्ये भाजपने उल्लेखनीय कामगिरी करत निवडणुकीत विजय मिळवला असून, देशभरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली शहरातही भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला. डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी एकत्र येत ढोल-ताशांच्या गजरात विजयाचा उत्सव साजरा केला.भाजप विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडत आनंद व्यक्त केला. यावेळी अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 05 May 2026 11:59 AM (IST)

    05 May 2026 11:59 AM (IST)

    मीरा-भाईंदरमध्ये भाजपचा जल्लोष; पश्चिम बंगालमधील यशाचा उत्सव

    भाईंदर : पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मीरा-भाईंदर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. शहरातील विविध भागांमध्ये फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.

    भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. “देशभरात भाजपची वाढती ताकद आणि जनतेचा वाढता विश्वास याचे हे प्रतीक आहे,” असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. काही ठिकाणी मिठाई वाटप करून नागरिकांनाही या आनंदोत्सवात सहभागी करून घेण्यात आले.

    या वेळी पक्षाच्या नेत्यांनी पश्चिम बंगालमधील मतदारांचे आभार मानत, पक्षाच्या धोरणांवर जनतेचा विश्वास वाढत असल्याचे सांगितले. आगामी काळातही देशभरात विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
    शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात आली. एकूणच, पश्चिम बंगालमधील यशाच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात आणि जल्लोषात विजय साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

  • 05 May 2026 11:45 AM (IST)

    05 May 2026 11:45 AM (IST)

    पश्चिम बंगालमधील भाजपच्या अभूतपूर्व यशानंतर सिंधुदुर्गात जल्लोष

    देशात झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके लावून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. कुडाळ शहरातील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, खासदार विनोद तावडे, मंत्री नितेश राणे आणि पश्चिम बंगाल भाजप संघटन प्रमुख सतीश धोंड यांचे आभार मानले.

  • 05 May 2026 11:36 AM (IST)

    05 May 2026 11:36 AM (IST)

    राहुल गांधी शतकाच्या उंबरठ्यावर!!

    पाच राज्याचा निकाल नुकताच लागला आहे. यात काँग्रेसच्या अपयशावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ९९ पराभवांचा टप्पा पार करून “शतकाच्या उंबरठ्यावर” पोहोचलेल्या राहुल गांधी यांचे खास अभिनंदन! आता फक्त एका पराभवाची गरज!… आणि, इतिहास रचला जाईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

  • 05 May 2026 11:24 AM (IST)

    05 May 2026 11:24 AM (IST)

    डोंबिवलीत धक्कादायक घटना; तीन लहान मुलांना रस्त्यावर सोडून आई पसार

    डोंबिवली पश्चिमेतील तुळशीराम बंगल्याजवळ सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. खाऊ आणायला जाते असे सांगून गेलेली आई आपल्या तीन लहान मुलांना रस्त्यावरच सोडून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या तीन मुलांमध्ये एक मुलगा आणि दोन मुली असून त्यांचे वय साधारणतः 4 ते 5 वर्षांच्या दरम्यान आहे. एका स्थानिक महिलेने शिवसेनेच्या महिला पदाधिकारी जयश्री यादव यांना याबाबत माहिती दिली.

  • 05 May 2026 11:13 AM (IST)

    05 May 2026 11:13 AM (IST)

    आंबे तोडले म्हणून 15 वर्षीय मुलाला अमानुष मारहाण, दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

    आपल्या झाडाचे आंबे तोडले म्हणून एका दाम्पत्याने 15 वर्षीय मुलाला अमानुषपणे बेदम मारहाण केली. ही घटना बदलापूरमध्ये घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 05 May 2026 11:04 AM (IST)

    05 May 2026 11:04 AM (IST)

    वसईत रेती माफियांना मोठा दणका; नागला बंदरात तहसीलदारांची धडक कारवाई!

    वसईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. वसईतील नागला बंदर परिसरात प्रशासनाने अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. तहसीलदारांनी टाकलेल्या धाडीत २ डंपर आणि लाखो रुपये किमतीची १२ ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

    वसईचे तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने आज पहाटे नागला बंदर परिसरात अचानक धाड टाकली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात छुप्या मार्गाने अवैध रेती उत्खनन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या.

  • 05 May 2026 11:01 AM (IST)

    05 May 2026 11:01 AM (IST)

    नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; अंगावर काटा आणणारी माहिती

    नसरापूरमधील पीडितेच्या उत्तरीय तपासणीचा अहवालात अनेक हादरवणाऱ्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे मुलीच्या तोंडात मोजा कोंबला होता. छातीवर मारहाणीचे वळ उमटले होते. यानंतर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला, असे अहवालात म्हटलं आहे. 

Web Title: Maharashtra desh videsh 5nd may breaking news politics economy live blog marathi national international sports crime lpl 2026 live breaking updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारणात मोठी खळबळ! सुनील तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर; शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण
1

Maharashtra Politics: राजकारणात मोठी खळबळ! सुनील तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर; शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

Ahilyanagar : शेकडो वारकऱ्यांचे ‘टाळ-मृदुंग’ आंदोलन; लवांडेंना अटकेचा इशारा
2

Ahilyanagar : शेकडो वारकऱ्यांचे ‘टाळ-मृदुंग’ आंदोलन; लवांडेंना अटकेचा इशारा

Devendra Fadnavis News: राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
3

Devendra Fadnavis News: राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान
4

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.