Photo Credit- Social Media फॉर्म्युला 83' ठरणार महायुतीच्या विजयाची किल्ली
मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही तास उरले आहेत. प्रचारसभा, आरोप प्रत्यरोपांंमुळे राजकारण तापलं आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत घडलेल्या घडामोडींचा निकाल या निवडणुकांमधून मिळणार आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्राची जनता भाजप प्रणित महायुतीच्या बाजूने निकाल देते की, ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या पारड्यात मते टाकते ते निकालाच्या दिवशीच कळणार आहे. महाराष्ट्रातील महायुतीचा निकाल तिच्या मेहनतीवर अवलंबून असेल, पण खरी मेहनत भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीला 83 जागांसाठी करावी लागणार आहे. या 83 जागा महाराष्ट्रात गेम चेंजर ठरतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्यांच्या इतर गटांच्या तुलनेत जनतेच्या दरबारात स्वतःला योग्य सिद्ध करण्याची संधी असेल.
महाराष्ट्रात खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे. ही लढाई इतकी सोपी नाही. कारण यावेळी नेत्यांना त्यांची प्रतिष्ठा, वारसा आणि लोकप्रियतेसाठी तर लढावी लागणार आहेच याशिवाय महायुती विरुद्ध महाविकास या लढतीत अशा अनेक छोट्या-मोठ्या लढायाही होणार आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. महायुतीत भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तर महाआघाडीमध्ये काँग्रेससोबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे.
शरद पवार न्यूज: ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय! शरद पवार यांचे महायुतीवर ताशेरे मारणारे खुलं पत्र
दोन वेगवेगळ्या गटात विभागलेले दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढण्याची महाराष्ट्रातील निवडणूक लढाईत कदाचित ही पहिलीच वेळ आहे. आधी शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि पक्षचिन्ह मिळालं. तर उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट झाले. अशा परिस्थितीत शिवसेनेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांना स्वबळावर स्वत:ला सिद्ध करण्याचे खडतर आव्हान आहे.
यंदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यां दोघांसमोरही स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान आहे. . तर शरद पवार यांना घड्याळाशिवाय (राष्ट्रवादीचे चिन्ह) आपली राजकीय विश्वासार्हता अबाधित ठेवण्याची संधी आहे.
देवेंद्र फडणवीस न्युज: ‘वोट-जिहाद’ चा मुकाबला करण्यासाठी…; महाराष्ट्रात ‘व्होट जिहाद’कोण करतंय? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
भारतीय जनता पक्षाला महायुतीत सर्वाधिक वाटा मिळाला असून राज्यातील 288 पैकी 149 जागांवर निवडणूक लढवत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना 81 तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 59 जागांवर निवडणूक लढवत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये, काँग्रेसला 101 जागा मिळाल्या आहेत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेना 95 जागा मिळाल्या आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 86 जागा मिळाल्या आहेत. लहान पक्षांमध्ये, महाविकास आघाडीचाभाग असलेल्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने 9 उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्षाने 237 उमेदवार उभे केले असून AIMIM ने 17 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
महाराष्ट्रात 288 पैकी सुमारे 158 जागांवर प्रमुख पक्ष किंवा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये 75 जागांवर थेट लढत होणार आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार विरुद्ध उद्धव ठाकरे या दोन गटात 46 जागांवर लढत होणार आहे. याशिवाय विधानसभेच्या 37 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी थेट लढत आहे.
विदर्भातील 35, पश्चिम महाराष्ट्रात 12, मराठवाड्यात 10 , मुंबईत 8, उत्तर महाराष्ट्रात 6 आणि कोकणात 4 जागांवर थेट लढत होणार आहे.
जनरल नॉलेज: जीवाशी खेळ! पाय ठेवायला जागा नाही तरीही तरूणाचा ट्रेनला लटकत प्रवास